"शिकू दया' ह्या मागणी करिता १६ फेब्रुवारी रोजी विद्यापीठावर अर्धनग्न मोर्चा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 12 February 2021

"शिकू दया' ह्या मागणी करिता १६ फेब्रुवारी रोजी विद्यापीठावर अर्धनग्न मोर्चा


नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रातील वरिष्ठ महाविद्यालयातील अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ प्रवेशाकरिता अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात नोंदणी केलेली आहे. अशा अनेक प्रवेशापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांचा 'शिकू दया' ही मागणी घेवून विद्यापीठ परिसरात अर्धनग्न मोर्चा काढण्यात येणार असल्याचे प्रा.राजू सोनसळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


कोवीड-१९ मुळे राज्य शासनाने सरसकट पास करुत अशी भूमिका घेतल्यामुळे पदवी तृतीय वर्षात दोन-तीन वर्षापासून अनुत्तीर्णानी परिक्षा आवेदन पत्र भरुन उत्तीर्ण झाले. अनुत्तीर्णांच्या वारंवार परिक्षा विद्यापीठाने घेतल्या. त्यामुळे 'उत्तीर्णाची संख्या जास्त व प्रवेशित जागा कमी' अशी अवस्था झालेली आहे. विद्यापीठ प्रशासनाने वंचित विद्यार्थी प्रवेशाचे तोंडी आश्वासन देऊन  दिवसांहून अधिकचा कालावधी लोटला आहे. तरी १५ फेब्रुवारी पासून महाराष्ट्रभर वरिष्ठ महाविद्यालयांच्या तासिका सुरु होत आहेत. तरी वंचित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता विद्यापीठ परिसरात सर्व पुरोगामी विद्यार्थी संघटनांच्या वतीने दिनांक १६ फेब्रुवारी २०२१ रोजी अर्धनग्न मोर्चा काढण्यात येणार असल्याचे प्रा.राजू सोनसळे यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Pages