‘माझं गाव सुंदर गाव’ अभियानास मांडवा (कि) येथून प्रारंभ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 12 February 2021

‘माझं गाव सुंदर गाव’ अभियानास मांडवा (कि) येथून प्रारंभकिनवट,दि.12 (प्रतिनिधी) : पंचायत समिती, किनवट अंतर्गत ‘माझं गाव सुंदर गाव’ या अभियानाची सुरूवात मंगळवारी (दि.09) मांडवा (कि) ग्रामपंचायत येथून झाली. या निमित्ताने गाव फेरी करीत अंगणवाडी,  प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, ग्रामपंचायत इमारतीची पाहणी करण्यात आली. यावेळी पदाधिकार्‍यांसह गावकर्‍यांनी ‘आपले गाव आदर्श गाव’ करण्याचा संकल्प केला.

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच माधव  सिडाम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून  नांदेड येथील स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप इंगोले, पं.स.किनवटचे गटविकास अधिकारी सुभाष धनवे, सहाय्यक गटविकास अधिकारी महामुने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, विस्तार अधिकारी उडतेवार, शिंदे साहेब, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रफुल बागल यांची प्रमुख उपस्थिती होती.

          या अभियानाबद्दल मार्गदर्शन करतांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी इंगोले म्हणाले की, विभागीय आयुक्त  सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून माझा गाव सुंदर गाव हा नाविन्य पूर्ण उपक्रम  राबविण्यात येत असून,  संत गाडगेबाबा अभियान व माझं गाव सुंदर गाव या अभियानामध्ये कुठलाही फरक नसून, गावातील सर्व शासकीय कार्यालये, अंगणवाड्या, जि.प. प्रा.शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, समाज मंदिर, गावातील प्रत्येक घर, रस्ते, नाली लोकसहभातून 22 जानेवारी  ते 20 मार्च 2021 पर्यंत स्वच्छ करण्यात यावे. तसेच शासकीय कार्यालयांचे सर्व  अभिलेख (रेकार्ड) अद्ययावत करण्यात यावे. याप्रसंगी प्रा.शाळेचे मु.अ.  मुंडे यांनीही आपले विचार मांडून आमचं मांडवा गाव आम्ही खरोखरच सुंदर करून जिल्ह्यात एक आदर्श गाव म्हणून पुढे आणूत, अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमास  गोवर्धन मुंडे, नरसिंग इरपेनवार, ग्रामसेवक  टी.जी.मोहारे, पेसा समितीचे अध्यक्ष अंबाजी मडावी, आरोग्य उपकेंद्र मांडवा कि. च्या वै.अ.डॉ.कविता जाधव, आरोग्य सेवक कोगुरवार,अंगणवाडी सेविका व आशा वर्कर उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Pages