माहूर तालुक्यातील वीज समस्या सोडवण्यासाठी आमदार केराम यांचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना पत्र.... दुर्गम भागातील वानोळा येथे शाखा कार्यालय सुरु करण्याची मागणी! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 17 March 2021

माहूर तालुक्यातील वीज समस्या सोडवण्यासाठी आमदार केराम यांचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना पत्र.... दुर्गम भागातील वानोळा येथे शाखा कार्यालय सुरु करण्याची मागणी!

 

 

माहुर:- प्रतिनिधी: 

जीर्ण अवस्थेतील विद्युत पुरवठा करणारी तार व खांब,अंतिम घटका मोजत असलेले रोहित्र व वीज कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे माहूर तालुक्यात वीज वितरण विभागाचा कारभार ढिसाळला आहे.या पार्श्वभूमीवर आमदार भीमराव केराम यांना नुकतेच राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना पत्र पाठवून नागरिकांच्या विषयक समस्यांशी अवगत केले आहे. 


डोंगर खोऱ्यात वसलेल्या माहूर तालुक्यात वाई बाजार येथे एकमेव सब स्टेशन शाखा कार्यालय कार्यान्वित आहे.वास्तविक भौगोलिक रचना पाहता वानोळा सर्कल मध्ये शाखा कार्यालय असणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु महावितरण कंपनीच्या वीज वितरण विभागाने या क्षेत्रामध्ये अद्याप आपले शाखा कार्यालय कार्यान्वित केलेले नसल्याने शेतकरी सामान्य नागरिकांना अतिशय किरकोळ कारणांसाठी देखील माहूरला खेटे घ्यावे लागते.कधीकधी तर या परिसरातील वीज पुरवठा तब्बल तीन तीन चार चार दिवस खंडित राहतो.परिणामी या परिसरातील शेतकरी सामान्य नागरिक आपल्या समस्या तक्रारी घेऊन आमदार भीमराव केराम यांना भेटण्यासाठी किनवट ला येतात.या सर्व समस्यांचा निपटारा करण्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना नुकतेच एक पत्र पाठवूनमाहूर तालुक्यातील ग्रामीण भागाचा भौगोलिक दृष्ट्या विस्तार मोठा असून या उपविभागात एकमेव वाई बाजार येथे शाखा कार्यालय कार्यान्वित असून दुर्गम डोंगराळ भागातील वानोळा परिसरात मध्यवर्ती ठिकाण असताना सुमारे 20 ते 25 खेडेगावचा संपर्क येतो येथील नागरिकांच्या वीज विषयक समस्या सोडवण्यासाठी येथे शाखा कार्यालय कार्यान्वित करून माहूर उपविभागीय कार्यालयात अनेक दिवसापासून मुख्य तंत्रज्ञ पद रिक्त असल्यामुळे मुख्य तंत्रज्ञ पद निर्मिती करून या परिसरातील विजेच्यानागरिकांची सोडवणूक करून त्यांना सुलभ सुविधा उपलब्ध होईल अशी व्यवस्था निर्माण करण्याची आग्रही मागणी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना आमदार भीमराव केराम यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Pages