वैद्यकीय विशेषज्ञांच्या किनवट भेटीने गंभीर रुग्णांना दिलासा सुंदर हॉस्पिटलच्या संचालकांच्या प्रयत्नांना यश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 17 March 2021

वैद्यकीय विशेषज्ञांच्या किनवट भेटीने गंभीर रुग्णांना दिलासा सुंदर हॉस्पिटलच्या संचालकांच्या प्रयत्नांना यश

 किनवट, दि.17 (प्रतिनिधी) :   शहरासह तालुक्यातील गंभीर आजारी रुग्णांच्या आरोग्यविषयक वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन, येथील सुंदर हॉस्पिटलचे संचालक डॉ.वसंत बामणे यांनी नांदेड येथील नारायणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे, गरजू रुग्णांच्या वेळेत व पैशात बचत झालेली आहे. शनिवार (दि.13) पासून या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने रुग्णसेवेस प्रारंभ केल्यामुळे, या डॉक्टरांसह येथील प्रशासकीय अधिकार्‍यांचा शहरातील मान्यवरांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला.


     या विशेषज्ञांमध्ये हृदयरोगतज्ज्ञ डॉ.अजित काब्दे, मेंदूरोग तज्ज्ञ डॉ.पंकज राठी, मधुमेह, थॉयराईड व लठ्ठपणा तज्ज्ञ डॉ.चैतन्य येरावार, मूत्रपिंड (किडनी) रोग तज्ज्ञ डॉ.शहाजी जाधव, संधीवात, जॉईंट रिप्लेसमेंट तज्ज्ञ डॉ.सुशील रंगदळ यांचा समावेश असून, दर महिन्याला यांची किनवट भेट राहणार आहे. मधुमेह, मूत्रपिंड विकार, मेंदूचे आजार या रुग्णांना वारंवार तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच नियमीत व दीर्घकाळ उपचार घेण्याची गरज असते. यासाठी शहरासह तालुक्यातील अनेक रुग्णांना उपचारार्थ नांदेड, यवतमाळ, आदिलाबाद किंवा हैद्राबादला जावे लागत होते. सध्या या सेवा किनवटलाच  सुंदर हॉस्पिटल अ‍ॅन्ड क्रिटीकल केअर सेंटर मध्ये उपलब्ध झाल्यामुळे, गरजू रुग्णांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.


         स्वागत समारंभामध्ये बोलतांना येथील सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी किनवट तालुक्यात उच्चप्रतीच्या आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होऊन लवकरच 100 खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे यासाठी लोकप्रतिनीधींसह प्रशासकीय अधिकारी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच गत पाच वर्षात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनीही रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरविल्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.


   या प्रसंगी  उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक,  तहसीलदार उत्तम कागणे, पोलीस निरीक्षक मारोती थोरात, डॉ.यु.बी. मोरे, डॉ.बालाजी तेलंग,डॉ.सोरटे, डॉ.सूर्यवंशी, डॉ.चिन्नावार,  डॉ.पोहरकर, डॉ.अकोले,  भगवान हुरदुके,  बालाजी मुरकुटे, बंडू नाईक, के.मूर्ती, इसाखान, प्रा.किशनराव किनवटकर, बिभिषण पाळवदे, पवार गुरुस्वामी, योगशिक्षक अखिलखान, प्रेमसिंग जाधव, कचरु जोशी, पांडुरंग राठोड, शेख मझर, रामराव जाधव, स्वागत आयनेनीवार, कपिल रेड्डी, नाना भालेराव, पत्रकार शकिल बडगुजर,  प्रमोद पोहरकर, नासीर तगाले, मलिक चव्हाण, प्रशांत वाठोरे, यांची उपस्थिती होती.  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महेश कनकावार, राजू सुरोशे, बालाजी बामणे, पमा शेळके, गोविंद धुर्वे, कपिल मेश्राम, कश कनाके, अशोक कनाके, आत्माराम जाधव, राम राठोड, योगेश जाधव, बालाजी बेले, पंकज हुल्काने, बालाजी पतंगे यांनी परिश्रम घेतल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हास्तरीय दिशा समितीचे सदस्य  मारोती सुंकलवाड यांनी  केले.

No comments:

Post a Comment

Pages