भाजपा महिला मोर्चा व अनु. जाती महिला आघाडी किनवट ची कार्यकारीणी जाहीर... - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 16 March 2021

भाजपा महिला मोर्चा व अनु. जाती महिला आघाडी किनवट ची कार्यकारीणी जाहीर...

 


किनवट, प्रतिनिधी

  भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा व अनु.जाती महिला आघाडी किनवट ची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली असून मा. आ. भिमरावजी केराम यांच्या भाजप कार्यालयातील विशेष कार्यक्रामात गठीत करण्यात आलेल्या शहर व ग्रामीण कार्यकारीणीच्या पदाधिका-यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


  आज दि. १६ मार्च रोजी मा. आमदार भिमरावजी केराम यांच्या किनवट येथील लोकार्पण, जनसंपर्क कार्यालयात भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे तसेच नांदेड जिल्हाध्यक्षा चित्रलेखाताई गोरे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मा. आमदार भिमरावजी केराम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 दरम्यान किनवट शहर व ग्रामिण महिला मोर्चा कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. दरम्यान सौ. सागरताई ज्ञानेश्वर शिंदे यांची महिला मोर्चाच्या किनवट तालुकाध्यक्षपदी यापुर्वीच निवड करण्यात आल्याने आजच्या निवड प्रक्रीये त्यांच्या स्वाक्षरीतच उर्वरीत नविन पदाधिका-यांची निवड करण्यात आली. यात सौ. विद्या सतिश पाटील, सौ. ज्योती प्रकाश साळवे  व सौ. सविता रोहिदास चव्हाण यांची उपाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे. सौ. वंदना अशोक गादेकर सरचिटणीस तर सौ.  मनिषा चौधरी व सौ. वैशाली जयभीम चंदने यांची चिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली. कोषाध्यक्षा पदावर सौ. शितल भिमराव हटकर यांची वर्णी लागली असून सौ. अंजली उदयसिंह राठोड व सौ. वनिता वेनुगोपाल निलावार यांची सदस्या  म्हणून निवड करण्यात आली आहे.

    तर अनुसुचित जाती महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा पदी गंगूबाई परेकार यांचीही निवड यापुर्वीच झाल्याने उर्वरीत पदाधिका-याची निवड करण्यात आली. यात उपाध्यक्षा म्हणून  नंदा भरणे, शकुंतला गिमेकर (सरचिटणीस), अनुसया उमरे व रमाबाई शंकर मुनेश्वर (सचिव), सुमनबाई मुदरूके (कोषाध्यक्षा), तर प्राची मुनेश्वर यांच्यासह शालूबाई श्रीधर पाटील, विलाबाई वसारे यांची सदस्या म्हणून निवड करण्यात आली.

  कार्यक्रमाच्या आयोजक सौ. सागरताई शिंदे पाटील व नियोजक सौ. पुनम लखनसिंह दिक्षित यांच्या अथक परिश्रमातून आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. भिमरावजी केराम, तर प्रमुख पाहूणे म्हणून भाजपा प्रदेश कार्यकारीणीच्या सौ. संध्याताई प्रफुल्ल राठोड यांच्यासह किनवटचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, भाजप तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा सुकेशनी कपाटे व सौ. पद्माताई गिर्हे माहूर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

   यावेळी निवड करण्यात आलेल्या महिला मोर्चा कार्यकारीणी पदाधिका-यांचे मान्यवरांसह पक्षपातळीवर सर्वच स्तरातून अभिनंदन होत असून महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित पदाधिका-यांना पुढील कार्यास भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत...

No comments:

Post a Comment

Pages