शिक्षण क्षेत्रातील डॉ सुधीर मेश्राम ह्यांच्या रूपाने मोठा संशोधक कुलगुरू व शेतकऱ्यांचा मित्र निवळला... मा आमदार प्रकाश गजभिये - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 15 March 2021

शिक्षण क्षेत्रातील डॉ सुधीर मेश्राम ह्यांच्या रूपाने मोठा संशोधक कुलगुरू व शेतकऱ्यांचा मित्र निवळला... मा आमदार प्रकाश गजभिये

 


नागपुर:

 जळगाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे मायक्रोबायलॉजी विभागाचे माजी विभागप्रमुख  राजीव  गांधी सेंटर चे माजी संचालक  व प्राध्यापक डॉ सुधीर मेश्राम यांचे नागपूर येथील अवंती हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने आंबेडकरी समाज पोरका झाला आहे ते फक्त ६५ वर्षाचे होते नागपूर विद्यापीठामध्ये राजीव गांधी सेंटर डॉ सुधीर मेश्राम यांनी सुरू केले होते.ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरद पवार,माजी पंतप्रधान मा राजीव गांधी व मा सोनिया गांधी यांच्या अत्यंत जवळचे सहकारी होते त्यांनी मा सोनिया गांधी यांना नागपूर विद्यापीठामध्ये आणले होते. डॉ सुधीर मेश्राम यांचे शेतीमध्ये उल्लेखनीय संशोधन होते तर शेतकऱ्यांचा जवळचा मित्र म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे दिल्ली येथे पुसा इन्स्टिट्यूट मध्ये उच्च शिक्षण झाले होते अगोदर पासून त्यांना राजकारणाची आवड होती  त्यांच्या सुविज्ञ पत्नी सौ ज्योत्स्ना मेश्राम ह्या नागपूर विद्यापीठात  केमिस्ट्री विभागाच्या विभाग प्रमुख आहेत.तर श्री शांकी मेश्राम मुलगा अमेरिकेत नोकरीला आहे.शिक्षण क्षेत्रातील हिरा ,आदर्श संशोधक, आदर्श कुलगुरू, व मिलनसार व्यक्तिमत्त्व, परिवर्तनवादी व आंबेडकरी चळवळीतील एक प्राध्यापक निवळला त्यांचे निधनाने न भरून निघणारी मोठी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया मा आमदार प्रकाश गजभिये यांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

Pages