सुधाकर महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 15 March 2021

सुधाकर महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

नांदेड, दि.१५: माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी सुधाकर महाजन मित्रमंडळ व नांदेड येथील क्रीसेंट ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे चक्री (ता. हदगाव) येथे सुधाकर महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार (दि. १५) रोजी रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. या शिबिरात जवळपास २८ च्यावर रक्तदात्यांनी रक्तदान केले.


काेराेना संक्रमण काळात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील युवकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे समर्थक, निष्ठावंत शिवसैनीक सुधाकर महाजन यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावर होणार अनावश्यक खर्च टाळून या शिबिराचे आयाेजन केले. या शिबिराचे उद्घाटन निवघा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष भगवानराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या भव्य रक्तदान शिबिरात जवळपास २८ च्यावर रक्तदात्यांनी रक्तदान केले. श्री महाजन यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. सदरील रक्तदान शिबिरास परिसरातील युवकांनी चांगला प्रतिसाद दिला. या रक्तदान शिबीरास भगवानराव शिंदे, विनायकराव कदम, राजेंद्र जाधव तळणीकर, वसंतराव खोडके,अमोल कदम कोहळीकर यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. शिबिराच्या यशस्वितेसाठी रामेश्वर गिरी, राहुल पद्माकर, गणपतराव सुर्यवंशी, वसंतराव खोडके, सुनिल सुर्यवंशी, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, प्रदीप पाईकराव, लक्ष्मीकांत पाईकराव, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, परमेश्वर कदम, अर्जुन पाईकराव, अंकुश तुपकरी, अरुण खंडाळे, गंगाधर मोरे, परमेश्वर खोडके, बालाजी सुर्यवंशी, मधुकर मोरे, कोंडबा  कृष्णापुरे,  भगवानराव खोडके आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages