कोरोना उपाययोजना प्रभावीपणे राबवितानाच लसीकरणाला गती देणार – मुख्य सचिव सीताराम कुंटे नवनियुक्त मुख्य सचिवांनी स्वीकारला पदभार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 1 March 2021

कोरोना उपाययोजना प्रभावीपणे राबवितानाच लसीकरणाला गती देणार – मुख्य सचिव सीताराम कुंटे नवनियुक्त मुख्य सचिवांनी स्वीकारला पदभार


मुंबई, दि. 1 : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना यशस्वीरित्या राबवितानाच लसीकरणाला गती देणे, अर्थव्यवस्थेला चालना देतानाच महत्त्वाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी करुन ते वेळेत पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज येथे सांगितले.


नवनियुक्त मुख्य सचिवांनी आज मुख्य सचिव कार्यालयात पदभार स्वीकारला. यावेळी मुख्य सचिवांचे उपसचिव उदय चौधरी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माजी मुख्य सचिव संजय कुमार यावेळी उपस्थित होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या उपाययोजना करण्यात येत आहे. त्यांची प्रशासकीय यंत्रणेमार्फत यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करतानाच राज्यात सुरु असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढविण्यात येणार आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला खीळ न बसता ती अधिक गतिमान होण्याकरिता प्रयत्न करतानाच राज्यात सुरु असलेले महत्त्वाचे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्य सचिव श्री.कुंटे यांनी सांगितले.

दिवसभरात विविध विभागाचे सचिव तसेच मान्यवरांनी मुख्य सचिव श्री.कुंटे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.


No comments:

Post a Comment

Pages