नांदेड जिल्ह्यात ३१ मार्च पर्यंत जिम, हॉटेल्स, बार व सर्व प्रकारची खाद्यगृह राहणार बंद जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांचे निर्देश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 17 March 2021

नांदेड जिल्ह्यात ३१ मार्च पर्यंत जिम, हॉटेल्स, बार व सर्व प्रकारची खाद्यगृह राहणार बंद जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांचे निर्देश



नांदेड: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोवीड-19 अर्थात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नाईलाजाने काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 31 मार्च 2021 पर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रकारचे हॉटेल्स, रेस्टारंट, खाद्यगृह, परमिटरूम, बेकरी, स्वीटमार्ट, चाटभांडार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 


माञ या निर्णयामुळे वरील आस्थापनांवर उपजिवीका अवलंबून असलेल्यांना अर्थिक अडचण येऊ शकते हे  लक्षात घेऊन तसेच नागरीकांच्या सोयीसाठी वरील आस्थापनांना पार्सल सेवा राञी 10.00 वाजेपर्यंत ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व जीम, व्यायामशाळा, सार्वजनिक उद्याने दि. 31 मार्च 2021 पर्यंत राहतील. 

कोरोनाला रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने मुकाबला करण्याची गरज आहे. त्यासाठी मास्क वापरणे, सतत हात धुणे आणि शारिरीक अंतर राखणे आवश्यक आहे. आपण याची काटेकोर अंमलबजावणी केली तर प्रशासनावर कठोर निर्णय घेण्याची वेळ येणार नाही.  कृपया नागरीकांनी वरील ञिसूञीचा अवलंब करून प्रशासनाला सहकार्य करावे आणि नांदेड जिल्हा कोरोनामुक्त करण्यात सहभाग नोंदवावा ही विनंती. हा निर्णय सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी कृपया ही पोस्ट शेअर करावी. 


●महत्वाची सूचना - आपण सर्वांनी एकञ येऊन या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी केली, आणि कोवीड-19 रूग्णांची संख्या कमी होऊ लागली तर परीस्थितीचा आढावा घेऊन या निर्णयांमध्ये  दि. 31 मार्च 2021 पूर्वी शिथीलता देण्यात येईल याची नोंद घ्यावी. 



No comments:

Post a Comment

Pages