फाल्गून पौर्णिमेनिमित्त दहा दिवसांचे श्रामणेर प्रशिक्षण शिबिर १८ मार्चपासून - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 17 March 2021

फाल्गून पौर्णिमेनिमित्त दहा दिवसांचे श्रामणेर प्रशिक्षण शिबिर १८ मार्चपासून

 


नांदेड - तालुक्यातील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खुरगाव नांदुसा संचलित श्रामणेर प्रशिक्षण व विपश्यना केंद्र खुरगाव येथे येत्या १८ मार्चपासून श्रामणेर शिबिरास प्रारंभ होणार आहे. हे शिबिर फाल्गून पौर्णिमा २८ मार्च पर्यंत चालणार असल्याची माहिती प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.


       शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या प्रादुर्भावामुळे समाज व समुह संपर्क तोडणे आवश्यक आहे. दहा दिवस श्रामणेर म्हणून बौद्ध जीवन, दिनचर्या जगत असतांना आपोआपच समुह संपर्क टाळल्या जाणार आहे. तसेच केंद्र व केंद्र परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम काटेकोरपणे पालन केले जाणार आहेत. दहा दिवसाच्या या शिबिरात भदन्त पंय्याबोधी थेरो, भदन्त सत्यशील महाथेरो, भंते संघरत्न, भंते चंद्रमुनी, भंते धम्मकीर्ती, भंते सुदर्शन, भंते श्रध्दानंद, भंते सदानंद,भंते सुनंद, भंते शीलरत्न,भंते सुमेध, भंते सुभद्र

भंते शीलभद्र हे शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत.‌ इच्छुकांनी ८३०८८८७९८८ या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी असे आवाहन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment

Pages