केंद्र सरकार च्या योजनांचा लाभ घेऊन महिलांनी उद्योगात पुढे यावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 17 March 2021

केंद्र सरकार च्या योजनांचा लाभ घेऊन महिलांनी उद्योगात पुढे यावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई दि.18 -   केंद्र सरकार च्या सूक्ष्म लघु उद्योग;व्हेंचर कॅपिटल;  कौशल्य विकास आणि  मुद्रा योजना आदी विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी उद्योग क्षेत्रात पुढे यावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी नुकतेच केले.  न्यू व्हेज प्रा.ली.  आणि रिपब्लिकन पक्षाच्या हॉस्पिटॅलिटी आघाडी तर्फे मागासवर्गीय महिलांचे अन्न प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण लोणावळा  येथे आयोजित करण्यात आले होते.त्याच्या समारोप सोहळ्यात  प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना ना. रामदास आठवले यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी रिपाइं चे हॉस्पिटॅलिटी आघाडी चे अध्यक्ष सनी अवसरमल; तेजस कांबळे; अमरीश ठक्कर; राजरत्न फुले; विशाल कांबळे; डॉ आयेशा सिद्दीकी आदी मान्यवर उपस्थित होते.


अनुसूचित जाती जमातीच्या   महिलांना उद्योजकता कौशल्य प्रशिक्षण देण्याचे शिबीर आयोजित करणे हा चांगला उपक्रम आहे.समाजात आर्थिक प्रगती साठी कार्यक्रम राबविला पाहिजे. बँक लवकर कर्ज देत नाही ही अडचण ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा कर्ज योजना सुरू केली.त्याचा लाभ देश भरातील 28 कोटी लोकांनी लाभ घेतला.आता पुरुषांच्या सोबत मागासवर्गीय  महिलांनी सुद्धा मोठया प्रमाणात उद्योगात पुढे आले पाहिजे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.यावेळी उद्योग प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अश्विनी नरवडे; सविता जाधव; सरला सोनटक्के; पुनम फुले; ज्योती धुमाळे; प्रियांका वाठोरे;या महिलांना ना.रामदास आठवले यांचे हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 


               

No comments:

Post a Comment

Pages