लॉकडाऊन चा पहिला दिवस यशस्वी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 25 March 2021

लॉकडाऊन चा पहिला दिवस यशस्वी


किनवट, ता.२५ :
जिल्ह्यात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा आज पहिला दिवस होता. यावेळी व्यापाऱ्यांनी नियमानुसार आपली प्रतिष्ठाने १२ वाजता बंद करून प्रशासनाला सहकार्य केले. प्रशासनातील कर्मचारी लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी झटताना दिसले . परंतु, विनाकारण दुचाकी व चारचाकी वरून फेरफटका करणाऱ्यांची संख्या जास्त दिसत होती. यातून पोलीस प्रशासनाची ,लॉकडाऊन संदर्भातील अनास्था निदर्शनास येत होती. शहरात अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने तंबाखू, गुटका व दारूची विक्री होत होती.

शहरातील विनाकारण फीरणाऱ्यांची संख्या कमी झाली नाहीतर कोरोना विषाणूच्या प्रादुभावाची साखळी तोडणे शक्य होणार नाही.

यावेळी महसूल प्रशासना तर्फे तहसीलदार उत्तम कागणे हे स्वतः दुचाकी वरून शहरासह परिसरातील परिस्थिती चा आढावा घेताना दिसले.  नगर परिषदेचे कर्मचारी देखील सकाळ पासून लॉकडाऊन च्या कामात कमालीची तत्परता दाखवताना निदर्शनास येत होते. नगर परिषद चे कर्मचारीबाजारपेठ बंद करायचे काम अत्यंत उत्कृष्ट पध्द्तीने करत होते.
   लॉकडाऊन च्या विरोधात सूर असून होळी व धुळवडीच्या नंतर लॉकडाऊन उठवण्यात यावा, अशी मागणी शहरातील हमाल व मापाडी संघटणेकडून करण्यात येत आहे
जिल्ह्यात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा आज पहिला दिवस होता. यावेळी व्यापाऱ्यांनी नियमानुसार आपली प्रतिष्ठाने १२ वाजता बंद करून प्रशासनाला सहकार्य केले.प्रशासनातील कर्मचारी लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी झटताना दिसले . परंतु, विनाकारण दुचाकी व चारचाकी वरून फेरफटका कारणाऱ्यांची संख्या जास्त दिसत होती. शहरातील विनाकारण फीरणाऱ्यांची संख्या कमी झाली नाहीतर कोरोना विषाणूच्या प्रादुभावाची साखळी तोडणे शक्य होणार नाही.

यावेळी महसूल प्रशासना तर्फे तहसीलदार उत्तम कागणे हे स्वतः दुचाकी वरून शहरासह परिसरातील परिस्थिती चा आढावा घेताना दिसले तर नगर परिषदेचे कर्मचारी देखील सकाळ पासून लॉकडाऊन च्या कामात कमालीची तत्परता दाखवताना निदर्शनास येत होते. मात्र नगर परिषद चे कर्मचारी याव्यतिरिक्त त्यांच्या प्रशासकीय कामात एवढी तत्परता दाखवत नाही तो भाग वेगळा पण बाजारपेठ बंद करायचे काम अत्यंत उत्कृष्ट पध्द्तीने ते करतात.

लॉकडाऊन च्या विरोधात सूर असून होळी व धुळवडीच्या नंतर लॉकडाऊन उठवण्यात यावा अशी मागणी शहरातील हमाल व मापाडी संघाणेकडून करण्यात आली.

 

No comments:

Post a Comment

Pages