औरंगाबाद : ( प्रतिनिधी ) एका अनुत्तीर्ण परदेशी विद्यार्थीनीस पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचे प्रकरण मौलाना आझाद कॉलेजच्या वर्तमान प्राचार्यांना चांगलेच भोवले असून ईसा यासीन या तरुण समाजसेवकाने सदरील प्रकरण चव्हाट्यावर आणून या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करताच जे एम एफ सी कोर्ट क्रमांक 07, माननीय प्रथम मुख्य न्याय दंडाधिकारी, औरंगाबाद यांनी कलम 156 ( 3 ) च्या 202 अन्वये चौकशीचे आदेश दिले आहेत.
याविषयी सविस्तर असे की, अफगाणिस्तान येथील विद्यार्थीनी खाकर खातेमा ही मौलाना आझाद कॉलेज मध्ये संगणकीय पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असताना वर्तमान प्राचार्य श्री. मझहर अहमद फारुकी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या डिप्युटी वाईस चांसलरपदी कार्यरत होते. विद्यार्थिनी खाकर खातेमा ही त्यावेळी प्रथम व द्वितीय वर्षी अनुत्तीर्ण असताना देखील तिला तृतीय वर्षाच्या अंतिम परीक्षेत पैशांचा बेकायदेशीर व्यवहार करून श्री. मझहर फारुकी यांनी उत्तीर्ण केले असल्याचा आरोप असणारे पुरावे श्री. ईसा यासीन यांनी न्यायालयात सादर केले. त्यात त्यांनी म्हटले की, सुरुवातीला सदरील विद्यार्थीनीस बी.एस.सी. च्या तृतीय वर्षासाठी प्रवेश देण्यात आला होता. मात्र कुलगुरूंनी दिनांक 24-10-2019 च्या कार्यालयीन नोट शीटच्या मान्यतेनुसार दि. 22 -11 -2019 च्या पत्रा नुसार महाविद्यालयाला प्रवेश रद्द केल्याची माहिती दिली. असा आरोप आहे की, विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाकडे, विशेषत: वरील गोष्टींचा विचार करता, सीआर पी सी च्या कलम 156 ( 3 ) च्या 202 अन्वये थेट तपास करणे आवश्यक असल्याचे तसेच मौलाना आझाद कॉलेजचे वर्तमान प्राचार्य श्री. मझहर फारुकी यांच्या विरोधात भा. द. वि. 420, 466, 468, 109 आणि 34 अन्वये चौकशीचे माननीय न्यायालयाने आदेश दिले आहेत.
याप्रकरणी ईसा यासीन यांच्याकडून ॲड. राशेद एम. सय्यद यांनी यशस्वीरित्या पैरवी केली.
No comments:
Post a Comment