सत्तेच्या पदापेक्षा रिपब्लिकन योद्धा हा सन्मान महत्वाचा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 10 March 2021

सत्तेच्या पदापेक्षा रिपब्लिकन योद्धा हा सन्मान महत्वाचा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


  मुंबई दि. 10  - दलित पँथरपासून ज्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मला साथ दिली. रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून समाजसेवा केली.सर्वच  रिपब्लिकन कार्यकर्त्यांना सत्तेचे पद मिळाले नाही मात्र  समाजात  रिपब्लिकन कार्यकर्त्यांचा मोठा सन्मान होतो. संघमित्रा गायकवाड यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना रिपब्लिकन योद्धा पुरस्कार माझ्या हस्ते देऊन स्तुत्य उपक्रम केला आहे.सत्तेच्या पदा पेक्षा रिपब्लिकन योद्धा हा पुरस्कार आंबेडकरी चळवळीच्या  दृष्टीने महत्वाचा आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी केले.पुण्यातील कॅम्प मधील रामकृष्ण हॉटेल च्या सभागृहात रिपाइं च्या महाराष्ट्र् प्रदेश उपाध्यक्षा संघमित्राताई गायकवाड यांच्या पुढाकारातून रिपब्लिकन पक्षाच्या जडणघडणीत भरीव योगदान देणाऱ्या आणि कोरोनाच्या संकटात गरजू गरिबांची जनतेची सेवा करणाऱ्या समाजसेवकांचा ना. रामदास आठवले यांच्या हस्ते  रिपब्लिकन योद्धा पुरस्काराने गौरव करण्यात आला. 

यावेळी पुण्यातील जुने जाणते रिपब्लीकन नेते रिपाइंचे राष्ट्रीय खजिनदार एम डी शेवाळे सर यांचा रिपब्लिकन योद्धा म्हणून ना रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मुंबईतील समाजसेवक विलास रुपवते;प्रेस फोटोग्राफर  देवेंद्र रणपिसे आदींचा रिपब्लिकन योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. 

 

आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची केरळ मध्ये भाजप शी युती होणार आहे  अशी घोषणा ना रामदास आठवले यांनी यावेळी केली.तसेच तामिळनाडू मध्ये ए आय डी एम के आणि भाजप सोबत रिपब्लिकन पक्षाची युती होणार असून एनडीए म्हणून तिथे रिपाइं ला 2 जागा सुटणार आहेत अशी माहिती ना रामदास आठवले यांनी दिली. तसेच आसाम आणि पश्चिम बंगाल मध्ये रिपाइं चे प्रत्येकी 15 जागा लढविण्याची  तयारी करण्यात आल्याची माहिती ना रामदास आठवले यांनी दिली.


                 

No comments:

Post a Comment

Pages