सुरज दामरे यांची सिनेट सदस्य पदावरून हकालपट्टी करा -स्वप्नील इंगळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 10 March 2021

सुरज दामरे यांची सिनेट सदस्य पदावरून हकालपट्टी करा -स्वप्नील इंगळे

 नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे राज्यपाल नामनिर्देशित सदस्य सुरज दामरे यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश सदस्य स्वप्नील इंगळे यांनी केली आहे.

    

सिनेट सदस्य हे पद प्रतिष्ठेचे असून विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी असते, परंतु सुरज दामरे हे पद भेटल्यापासून विद्यापीठात इतरांच्या कामाच्या तक्रारी करण्यात व्यस्त असतात.2017 साली झीन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पुणे एम.ई. च्या परीक्षेदरम्यान गैरव्यवहार केल्या संदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या आदेशानुसार गठित महेश काकडे  चौकशी समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषदेत सादर करण्यात आला होता .सदर समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी नुसार दामरे यांना परीक्षेच्या कामकाजासाठी 3 वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे,अध्यादेश क्र.9(14)(13)नुसार त्यांना 25,000 रु  दंड आकारण्यात आला आहे .


या प्रकारामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन झाली आहे . 

      या कारणामुळे विद्यापीठाने तात्काळ बैठक घेऊन राज्यपालांना दामरे यांची हकालपट्टी करावी तसा प्रस्ताव पाठवावा .अन्यथा पुढील बैठकीत त्यांच्या तोंडावर काळे फासण्यात येईल असे इंगळे यांनी एका पत्रा द्वारे विद्यापीठ प्रशासनास कळविले आहे.


No comments:

Post a Comment

Pages