किनवट :
जागतिक महिला दिनानिमित्त पाळी या विषयावर जनजागृती चा कार्यक्रम संथागार वृद्धाश्रमात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या अॅड प्रियंका सुनिल कैवारे पाटील आणि सहभागी वक्ते युवा प्रबोधनकार अतुलराज बेळीकर ह्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच
ॲड दिपा सोनकांबळे,ॲड सुनयना सिडाम यांनी कायद्याची माहिती दिली.
पाळी ही विटाळ नाही ती नैसर्गिक देणगी आहे त्या बद्दल समाजात असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमा मार्फत केला गेला.
यावेळी अनिकेत कुत्तरमारे यांच्या कडून देण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले..
कार्यक्रमाचे उद्घाटन मा.नगराध्यक्षा शितल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
समारोप स्मिता पहुरकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आला..सर्व मान्यवरांचे स्वागत मा.करुणा आळणे आणि मा. अरुण आळणे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रा. रामप्रसाद तौर सर हे कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.
या कार्यक्रमात सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या शाळेच्या विद्यार्थ्यीनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन संथागार वृध्दाश्रमाच्या अधिक्षक आकांक्षा आळणे ह्यांनी केले होते..
 

 
 
 
 
 
 
 
 
 
No comments:
Post a Comment