मुंबई दि. - मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांना त्यांच्या हक्काचे मालकी हक्काचे घर मिळावे यासाठी लवकरच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी आज त्यांना भेटलेल्या सफाई कामगारांच्या शिष्टमंडळा ला दिले.या शिष्टमंडळाने नेतृत्व दैनिक नवाकाळ च्या संपादिका जयश्री खाडिलकर पांडे यांनी केले. यावेळी संपादिका जयश्री खाडिलकर यांनी मुंबई मनपाच्या सफाई कामगारांच्या घराबाबत मुंबई मनपा प्रशासनाने घुमजाव केले असल्याची बाब ना.रामदास आठवले यांच्या निदर्शनास आणून सफाई कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करण्याबाबत विनंती केली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेतून मुंबई मनपामध्ये 25 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कामगारांना त्यांच्या मालकी हक्काचे घर देण्याची योजना राज्य सरकार ने सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या सरकार मध्ये या योजनेतून 50 सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर दिले गेले आहे.या योजनेतून उल्हासनगर आणि धुळे मनपा मध्ये ही सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर दिले गेले आहे.मात्र मुंबई मनपा सफाई कामगारांना डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेतून घर देण्यास नकार देत आहे. या योजनेतून सफाई कामगारांना घर देणे मुंबई मनपा वर बंधनकारक असताना जागा नाही अशी सबब देऊन मुंबई मनपाने सफाई कामगारांना घर देण्याच्या शब्दापासून घुमजाव केल्याची माहिती संपादक जयश्री खाडिलकर यांनी ना रामदास आठवले यांना सांगितली.
मुंबई मनपा च्या सफाई कामगारांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्याचा आपला निर्धार असुन वेळ पडली तर हक्काच्या घरासाठी मुंबई मनपा च्या सफाई कामगारांनी आंदोलन छेडावे त्यांच्या आंदोलनास रिपब्लिकन पक्षाचा सक्रिय पूर्ण पाठिंबा राहिल असे ना रामदास आठवले यांनी सफाई कामगारांच्या शिष्टमंडळाला सुचिविले.
मुंबई मनपा च्या सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर मिळावे यासाठी आपण नुकतीच संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेतली होती.याबाबत लवकरच मुंबई मनपा आयुक्तांना स्मरणपत्र पाठविणार आहोत.तसेच मुंबई मनपा च्या सफाई कामगारांना एस आर ए; आणि एम एम आर डी ए मार्फत राज्य सरकार ने घरे द्यावीत याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ असे आश्वासन ना रामदास आठवले यांनी दिले.
No comments:
Post a Comment