क्रीडा क्षेत्रातील समस्या दूर करण्यासाठी केंद्रिय क्रीडा मंत्र्यांची भेट घेणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 4 March 2021

क्रीडा क्षेत्रातील समस्या दूर करण्यासाठी केंद्रिय क्रीडा मंत्र्यांची भेट घेणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


 नवी दिल्ली दि. 24 - क्रीडापटूंच्या समस्या सोडविण्यासाठी;  एकूण क्रीडा क्षेत्रातील सर्व समस्या दूर करण्यासाठी लवकरच आपण केंद्रीय क्रीडा मंत्र्यांची आपण लवकरच भेट घेऊ असे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज दिले. त्यांच्या नवी दिल्लीतील सफदर  जंग रोड वरील  निवासस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) आयोजित पक्षाच्या क्रीडा आघाडी चा शुभारंभ करण्यात आला.त्यावेळी ना रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपाइं क्रीडा आघाडी च्या राष्ट्रीय  प्रमुख संघटक पदी दिनेश कांडा यांची नियुक्ती ना. रामदास आठवले यांनी केल्याची अधिकृत घोषणा ना रामफस आठवले यांनी केली.


आरपीआय क्रीडा आघाडी संपूर्ण देशातील प्रत्येक राज्यात स्थापन करण्यात येईल.क्रीडा आघाडी द्वारे  खेळाडूंना प्रोत्साहन मार्गदर्शन मदत करण्यात येईल. खेळाडूंच्या समस्या सिडविण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची क्रीडा आघाडी देशभर कार्यरत राहील अशी घोषणा ना रामदास आठवले यांनी आज केली.


                 

No comments:

Post a Comment

Pages