शिष्यवृत्ती आवेदन पत्र भरण्याची मुदत वाढवा रिपब्लिकन विद्यार्थी सेना ; प्रादेशिक उपयुक्त,समाजकल्याण यांना निवेदन सादर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 31 March 2021

शिष्यवृत्ती आवेदन पत्र भरण्याची मुदत वाढवा रिपब्लिकन विद्यार्थी सेना ; प्रादेशिक उपयुक्त,समाजकल्याण यांना निवेदन सादरऔरंगाबाद:

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने  दि.३० मार्च २०२१ रोजी भारत सरकार शिष्यवृत्ती चे आवेदन  पत्र भरण्यास मुदतवाढ द्यावी अशी मागणी करणारे निवेदन श्री. जलील शेख, प्रादेशिक उपायुक्त, सामाजिक न्याय विभाग,औरंगाबाद यांना मेल द्वारे देण्यात आले.

निवेदनात कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे अनेक भागात स्थानिक प्रशासनाने लोकडाऊन ची घोषणा केली असल्याने अनेक विद्यार्थ्यांना कागदपत्रांअभावी,आवेदन पत्र भरण्याची सोय उपलब्ध न झाल्याने आवेदन पत्र भरता आले नसल्याने अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहण्याची शक्यता असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.

कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शिष्यवृत्ती आवेदन पत्र भरण्यास तातडीने मुदतवाढ द्यावी व जोपर्यंत जनजीवन पूर्ववत होत नाही तोपर्यंत शिष्यवृत्ती आवेदान पत्र स्वीकारावे अशी मागणी करण्यात आली.

भारत सरकार शिष्यवृत्ती ही गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्यभूत ठरत असल्याने एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहता कामानये ह्याची दक्षता घ्यावी अशी विंनती करण्यात आली.


निवेदनावर सचिन निकम

(मराठवाडा अध्यक्ष),ऍड.अतुल कांबळे(जिल्हाध्यक्ष)प्रा.प्रबोधन बनसोडे(मराठवाडा संघटक),इंजि.अविनाश कांबळे(मराठवाडा सहसंघटक),सागर ठाकूर,गुरू कांबळे,महेंद्र तांबे,सागर प्रधान,प्रकाश उजगरे,कुणाल भालेराव आदींची नावे आहेत

No comments:

Post a Comment

Pages