किनवट येथील इस्लामपुरा वार्ड क्र.१२ व १३ मध्ये पाण्याची टंचाई , नगर परीषदेने तात्काळ लक्ष देण्याची नागरीकांची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 1 April 2021

किनवट येथील इस्लामपुरा वार्ड क्र.१२ व १३ मध्ये पाण्याची टंचाई , नगर परीषदेने तात्काळ लक्ष देण्याची नागरीकांची मागणी

(ता. प्र.किनवट ):-

किनवट नगर परिषदे अंतर्गत येणाऱ्या इस्लामपुरा वार्ड क्र.१२ व १३ येथील फेरोज सरांचे घर ते गफ्फार खुरेशी यांच्या घरा पर्यंत अशा एकूण ४० घरांच्या नळांना गेल्या ६ महिण्या पासुन नगर पालीकेचा बोअर बंद असल्यांने नागरीकांची ऐन उन्हाळ्यात खुप हाल होत आहे तरी या गंभीर प्रश्न सोडवुन नागरीकांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा अशा आशयाच्या मागणीचे  निवेदन मुख्याधिकारी किनवट यांना दिले आहे हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अन्यथा इस्लामपुरा वार्ड क्र .१२/१३ येथील नागरीक घागर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे 

या निवेदनावर  इकबाल शेख हुसेन, हाजी याखुब साब, सरफाज सर, जीया सर, शेख रहीम, अब्दुल्ला चाऊस, मसुद चाऊस, अर्शद खान, हमिद खुरेशी, गफार खुरेशी, छोटु खुरेशी, मैमुना बेगम शे.सत्तार, शेख नईम शे. रहेमान, गनी खुरेशी, रतन बेगम सायबान खुरेशी, सत्तार खुरेशी , आझीम खुरेशी, जरीना बी. कुरेशी, शेख हसन शेख सत्तार आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages