नांदेड :
करोना वैष्वीक महामारीचा वाढता प्रभाव पाहता आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे युवा नेते बालीभाऊ कांबळे यांनी आपला विवाह अतिशय साध्य पध्दतीने साखर पुड्यातच केला व लग्नात होणारा पैसाचा अपव्यात टाळून आपला मंगल परिणय विधीचा खर्च समाज उपयोगी उपक्रमासाठी वापरून समाजा पुढे एक आर्दश निर्माण आहे.
आपल्याकडे लग्न म्हटले बॅण्ड बाजा ,डिजे,घोडा बारात फटाके,मान-पान आदी मौज मजा मोठी हौस आणी या हौसेपायी अनेकांनी आपल्या मुला-मुलीच्या लग्नात करोडो रुपयाची उधळपट्टी केली व करणारे अनेक हौशी आईवडील, नवरदेव पाहिले व असे हौसी लग्न संमारंभ आपण बरेच पाहिले आहेत व पाहितो आहे म्हणतात ना हौसेला मौल नाही. पण या सार्या बाबी बाजुला ठेवण्याचे काम एका दांम्पत्याने केले आहे.
शहरातील धडाडीचे युवा नेते बालीभाऊ कांबळे व वधू कांचन जोंधळे 'यांचे विवाह जुळले आणी परिणयाच्या बाबत चर्चा सुरू झाली यावेळी नवरदेव बालीभाऊ यांनी आपला विचार वधू कांचन यांना सांगितला कि सध्या संपूर्ण जग कोरोना महामारीमुळे त्रस्त झाले आहे. या महारीचा वाढता प्रभाव पहाता आपण साध्या पध्दतीने व समाज उपयोगी उपक्रम राबवून विवाह करावा आसा प्रस्ताव मांडला आणी दोघांच्या व नातेवाईकांच्या संमतीने लग्नातील सार्या खर्चीक अनाठायी उठाठेव व हौस परंपरा बाजुला ठेवुन अतिशय साध्या पध्दतीने नातेवाईकांच्या सहमतीने साखरपुड्यातच लग्न सोहळा पारपडला या लग्न सोहळ्याची खास बाब म्हणजे
सामाजिक प्रश्नावर जागरूकपणे काम करणारे नवरदेव बालीभाऊ कांबळे यांनी नवरीकडच्या मंडळाकडून होणाऱ्या खर्चाला सुध्दा टाळले आणी नवरी व नातेवाईक यांच्या संमती व साक्षीने झाडे लावा - झाडे जगवा हा संदेश कृतीत उतरवून नवीन वृक्षांची पुष्पाने पुजा करून २०० वृक्षाची लागवड केली आहे.तर गरिब कुटुंबाच्या ६ मुला-मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्य व कपडे भेट दिली आहे.तर ६ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे.यापुढे जाऊन या दांपत्याने एका गरीब मुलीच्या लग्नासाठी ११ हजार रूपयाची भेटही देऊन आपले सामाजिक कर्तव्य पुर्ण केले आहे.
नवदांम्पत्यानी साखरपुड्यातच साध्या पध्दतीने मंगल परिणय करून विवीध समाज उपयोगी उपक्रमाने पार पाडुन समाजा पुढे एक आर्दश ठेवला आहे.निश्चितच या नव दांपत्यांचा इतर वधुवरांनी आदर्श घ्यावा आसा हा परिणय सोहळा आहे.नववधुवरांनी व त्यांच्या नातेवाईकांनी आजच्या काळाची गरज म्हणून विवाह साध्या पद्धतीने कमी खर्चात व समाजोपयोगी उपक्रम राबविले पाहिजे अश्या प्रतिक्रिया नववधूवरांनी व्यक्त केल्या आहेत.यानवपरिणीत दांपत्याचे समाजातून विशेष कौतूक करून अभिनंदन केले जात आहे.
No comments:
Post a Comment