मराठी पत्रकार परीषद किनवट संलग्नीत इलेक्ट्राॅनीक मीडीया प्रेस क्लब किनवट ची नविन कार्यकारीणी जाहिर. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 28 February 2021

मराठी पत्रकार परीषद किनवट संलग्नीत इलेक्ट्राॅनीक मीडीया प्रेस क्लब किनवट ची नविन कार्यकारीणी जाहिर.

 


किनवट :

इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब किनवट ची नविन कार्यकारिणी गठित करण्यासाठी साधारणता आजपर्यंत ३ ते ४ बैठक संपन्न झाल्यानंतर शेवटी आज दिनांक २८ फेब्रुवारी रविवार रोजी इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब किनवट ची जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नविन कार्यकारिणी मध्ये इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब किनवट तालुकाध्यक्ष म्हणुन लक्ष्मीकांत मुंडे तर  कार्यध्यक्ष म्हणुन आशिष शेळके, आणि सचिव म्हणून शेख परविन व उपाध्यक्ष पदी सुहास मुंडे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

 


        किनवट तालुक्यातील प्रथम पत्रकार तथा माजी नगराध्यक्ष मा. ईसाखान साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली हि नविन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. बैठकीमध्ये ईसाखान साहेब सोबतच, काॅम्रेड गंगारेडी साहेब व बापु तेरे देश में चे संपादक अहमद सर, किनवट तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस चे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते व ज्या प्रतिनिधींना उपस्थित राहता आले नाही त्यांनी व्हिडीओ काॅल वरुन मिंटीग मध्ये उपस्थिती दर्शविली व नविन कार्यकारिणी साठी संमती दिली. बैठकीमध्ये बोलताना ईसाखान साहेब म्हटले की, युवा वर्गांनी संघटनेचा पदभार स्वीकारुन खुप छान कार्य केलं आहे, कारण युवकच देशाचे भविष्य घडवु शकतात. तर अहमद सर व गंगारेडी सर यांनी सर्व नविन कार्यकारिणीला आश्र्वासन दिलं की कुठलीही अडचण आल्यास आम्हि सदैव तुमच्या सोबत आहोत. तसेच मराठी पत्रकार परिषद किनवट चे तालुका अध्यक्ष अनिल भंडारे सर व सचिव मलिक चव्हाण यांनी बैठकीत उपस्थित राहुन नविन कार्यकारिणीस मार्गदर्शन करुन पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब किनवट ची नविन कार्यकारिणी पुढील प्रमाणे,

लक्ष्मीकांत मुंडे (तालुकाध्यक्ष), आशिष शेळके (कार्यध्यक्ष), शेख परविन (सचिव), सुहास मुंडे (उपाध्यक्ष), ज्ञानेश्वर पवार (उपाध्यक्ष), सम्यक सर्पे (कोषाध्यक्ष), प्रणव कोवे (सहसचिव), अरविंद सुर्यवंशी (सहसचिव), लखन जाधव (सहकोषाध्यक्ष), शेख मजहर (सहकोषाध्यक्ष), प्रज्वल कारले (प्रसिद्धी प्रमुख), बापुराव वावळे (सदस्य), इम्रान अली (सदस्य), सय्यद नदीम (सदस्य).

No comments:

Post a Comment

Pages