बौद्ध कुटुंबावर झालेल्या सामूहिक हल्ल्या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील शिवानी जामगा गावाला दि.2 मार्च रोजी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले भेट देणार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 28 February 2021

बौद्ध कुटुंबावर झालेल्या सामूहिक हल्ल्या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील शिवानी जामगा गावाला दि.2 मार्च रोजी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले भेट देणार

मुंबई दि.28 - नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील शिवनी जामगा या  गावातील बौद्ध युवक  संदीप दुधमल यांच्या घरावर झालेल्या सामूहिक हल्ल्याचा रिपाइं तर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे..या प्रकरणी  पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी दि.2 मार्च रोजी घटनास्थळी शिवणी जामगा गावात भेट देणार  असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.


नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील शिवनी जामगा या गावात संदीप दुधमल यांच्या सायकल  गावातील सवर्ण समाजाच्या तरुणांच्या मोटर सायकल ची धडक लागली. त्या बाबत विचारणा केली म्हणून संदीप दुधमल यांच्या सह त्यांच्या कुटुंबावर सामूहिक हल्ला झाला. त्यात हल्ला करू नका म्हणून मध्यस्थी करण्यास गेलेल्या गणेश एडके या तरुणाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आला. तो तरुण गंभीर जखमी आहे.या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले हे  पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवनी जामगा या गावाला दि.2 मार्च रोजी भेट देणार आहेत असे रिपाइं तर्फे काळविण्यात आले आहे.


               

No comments:

Post a Comment

Pages