मुंबई, दि. १४ - सायन कोळीवाडा, कोकरी आगर येथे सुजाता भागोडे या तरुणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सुदैवाने बचावलेल्या तरुणीवर सायन रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या हल्ल्या प्रकरणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या सायन कोळीवाडा ( वार्ड क्रमांक१७५) तालुका अध्यक्षा सुगंधा सोंडे, दक्षिण मध्य मुंबईच्या जिल्हाध्यक्ष जयश्री गायकवाड यांनी वडाळा टी टी पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन दिले. आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सायन कोळीवाडा येथील कोकरी आगार या ठिकाणी राहणाऱ्या सुजाता भागोडे या तरुणीवरती तिच्याच घरात प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या सुजाताला तात्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या हल्ल्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या सायन कोळीवाडा तालुका अध्यक्षा सुगंधा सोंडे यांनी एका निवेदनाद्वारे केली. तसेच सायन रुग्णालयात जाऊन जखमी सुजाताच्या प्रकृतीची चौकशी करून तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी तिला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन सुगंधा सोंडे यांनी दिले. दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्षा जयश्री गायकवाड, अशोक इंगळे यावेळीउपस्थित होते.
No comments:
Post a Comment