अनुसूचीत जाती व नवबौद्ध विद्यार्थी शैक्षणिक सत्र 2019-20 स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 6 April 2021

अनुसूचीत जाती व नवबौद्ध विद्यार्थी शैक्षणिक सत्र 2019-20 स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित

नागपूर : 

शैक्षणिक सत्र 2019-20 मध्ये स्वाधार योजने अंतर्गत नागपूर जिल्हयात निवड झालेल्या 1300 विद्यार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम डिसेंबर 2020 ला देण्यात आली होती. त्याच धर्तीवर जानेवारी महिण्यात मा. आयुक्त यांचेद्वारे 40 कोटी रक्कम स्वाधार योजनेचे थकित हप्ते विद्यार्थ्यांना देण्यासंदर्भातचे आदेश औरंगाबाद तसेच नागपूर जिल्ह्याला देण्यात आले होते. जेव्हा की एकट्या  नागपुरात 1300 विद्यार्थ्यांकरिता 150 कोटी कमीतकमी रक्कम अपेक्षित होती. असे असताना एक हप्ता सोडून उर्वरित हप्ते विद्यार्थ्यांना मिळालेले नाही. स्वाधार योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांची परिस्थिती अत्यंत हालाखिची असल्याकारणे त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. एकप्रकारे हा विद्यार्थ्यांवर अन्याय समाज कल्याण विभाग यांचेद्वारे करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे. या सर्व बाबींना समाज कल्याण विभाग दोषी आहे. विद्यार्थ्यांवर उद्भवलेल्या या सर्व बाबींचा विचार करून स्वाधार योजनेचे थकित हप्ते तात्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्या संदर्भात विविध संघटनेच्या वतीने सयुक्तिक निवेदन देण्यात आले त्यात प्रामुख्याने मानव अधिकार संरक्षण मंचचे आशीष फुलझेले, रिपब्लिकन आघाडीचे संजय पाटील, सचिन गज्भीये, द प्लॅटफॉर्म चे राजीव खोब्रागडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे भूषण वाघमारे, आशीष तितरे, प्रकाश वाघमारे आदि उपस्थित होते.
No comments:

Post a Comment

Pages