कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृतीवर भर देऊन जयंती साजरी करा समाजाची सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांचे आंबेडकरी जनतेला सहकार्याचे अवाहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 6 April 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृतीवर भर देऊन जयंती साजरी करा समाजाची सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांचे आंबेडकरी जनतेला सहकार्याचे अवाहन

औरंगाबाद :

कोरोनाच्या प्रादुर्भावाने सगळीकडे भीती अन चिंतेचे वतावरण निर्माण झाले आहे परंतु भीम जयंतीच्या उत्सवातील उत्साह आपल्याला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे सामर्थ्य देईल असा विश्वास आज पोलीस आयुक्त कार्यालयात सकाळी 11 च्या सुमारास आंबेडकरी कार्यकर्ते व पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटीत पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी व्यक्त केला.

आंबेडकरी जनतेमध्ये असलेला भीमजयंती चा उत्साह हा नागरिकांना कोरोनाला रोखण्याचे सामर्थ्य देणारा आहे.देशातील आरोग्य सुविधेची झालेली वाताहत पाहता कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सर्व नागरिकांची जनजागृती करण्यावर भर देऊन भीमजयंती साजरी करावी असे आवाहनही त्यांनी केले.


यावेळी पोलीस आयुक्त श्री.निखिल गुप्ता,पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील,पोलीस उपायुक्त दिपक गिऱ्हे,पो.उपायुक्त मीना मकवाना, सहा.पोलीस आयुक्त श्री.भापकर,जेष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते श्रावण गायकवाड, नि.पोलीस उपअधीक्षक दौलतराव मोरे,विजयराव साळवे, विद्यार्थी प्रतिनिधी सचिन निकम व विशेष शाखेचे कर्मचारी आदींची उपस्थिती होती.



शासनाच्या निर्देशानुसार सर्वांनी भीमजयंती साजरी करावी काही दिवसांत शासनाच्या भीमजयंती बाबतच्या सूचना येतील तोपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे. औरंगाबाद जिल्हा हा कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या जिल्ह्यामध्ये आघाडीवर आहे.आरोग्य सुविधेची कमतरता,अपुरी साधने ह्याचा विचार करता समाजातील प्रत्येक घटकांची सुरक्षा ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असे मत पोलीस उपायुक्त श्री.निकेश खाटमोडे पाटील यांनी व्यक्त केले.


जेष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते श्रावण गायकवाड यांनी डॉ.बाबासाहेबांचे नातू ऍड.बाळासाहेब आंबेडकरांनी समस्त जनतेला शासन निर्देशाचे पालन करून भीमजयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे त्याला सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद आहे.

परंतु पोलीस व जिल्हा प्रशासनाने आंबेडकरी जनतेशी सहकार्याची भावना ठेवावी सलग दोन वर्षे जयंती साजरी करता येत नाही ह्यामुळे आंबेडकरी अनुयायी अस्वस्थ आहेत त्यांना प्रशासनाने विश्वासात घ्यावे कोरोनाच्या निर्देशानुसार अटीशर्थीसह अभिवादनाची परवानगी द्यावी आंबेडकरी जनता केवळ जल्लोष करून जयंती साजरी करते असा गैरसमज करण्यात येतो परंतु लोकोपयोगी उपक्रम,जनजागृती व प्रबोधनावर भर देणारे उपक्रम राबविण्याची आमची परंपरा आहे कोरोनाकाळात उपक्रमाची रूपरेषा पाहून प्रशासनाने सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा अशी विंनती त्यांनी केली तसेच कोरोनाच्या विरोधात प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून आंबेडकरी कार्यकर्ता उभा राहील अशी भूमिका मांडली.


पोलीस व जिल्हा प्रशासन यांनी नागरिकांच्या वतीने अभिवादन करावे फिजिकल डिस्टनसिंग चे पालन करून जयंती चे नियोजन करण्यासाठी आवाहन करू जनजागृती साठी प्रशासनाने संवाद वाढवावा असे मत व्यक्त केले.


विजयराव साळवे यांनी आंबेडकरी कार्यकर्ते हे कायम प्रशासनाला सहकार्य करते कोरोनाच्या काळातही हे सहकार्य कायम असेल असे आश्वस्त केले.


तर शहरातील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करावी,सर्व महापुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छता व्हावी,सजावटीला परवानगी द्यावी,आंबेडकरी कार्यकर्ते भीमसैनिक यांना विश्वासात घ्यावे,सर्व जयंती मंडळाची बैठक घेऊन सहकार्याचे आवाहन करावे,भडकलगेट येथे होणाऱ्या अभिवादनाची नियम अटी च्या अधीन राहून परवानगी द्यावी,कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जमावबंदी आदेशाचे पालन करावे,लसीकरण शिबिरात अधिक लसीकरण कसे होईल ह्या साठी प्रयत्न करावे आदी विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.शिवाय आंबेडकरी अनुयायांची बैठक घेण्यावरही आयुक्त श्री.गुप्ता यांनी सकारात्मकता दर्शविली.

No comments:

Post a Comment

Pages