मुंबई.
"कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते . ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते , तीची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते . " - डॉ . बाबासाहेब आंबेडकर डॉ बाबाबसाहेबांनि 3 एप्रिल 1927 ला मराठी पाक्षिक " बहिष्कृत भारत " सुरू केले होते .त्यांनी एकाच वेळी असमानतेच्या सामाजिक , सांस्कृतिक , धार्मिक आणि राजकीय प्रकारांविरूद्ध निर्णायक संघर्ष केला . यामुळे टीकाकारांनी त्याच्यावर हल्ला केला . द्विज देशभक्त मासिकांनी त्यांच्यावर अनियंत्रित आरोप केले . डॉ . आंबेडकरांना आपले मत मांडण्याची आणि विरोधकांच्या मताची वस्तुस्थितीशी व तार्किकदृष्ट्या , परंतु जोरदारपणे टीका करण्याची दृढनिश्चय त्यांच्या डोळ्यासमोर आली . ' बहिष्कृत भारत ' त्यांची आवश्यकता पूर्ण करण्याचे साधन बनले . दोन शब्दांत दोन भारत ! , बहिष्कृत , पण भारत ! भारत पण बहिष्कृत ! बहिष्कृत भारताच्या माध्यमातून आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना सल्ला देण्यास व टीकाकारांवर हल्ला करण्यास सुरवात केली . आज तेच पाक्षिक त्याच ठिकाणी म्हणजे जिथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी याची व्हीवरचना केली तिथेच म्हणजे परळ येथील बीआयटी चाळ येथेच नव्या रुपात म्हणजे डिजिटल मीडिया - न्युज पोर्टल व युट्युब चॅनेल च्या रुपात अनावरण करण्यात आले .
कार्यक्रमाचे उदघाटन बौद्धजन पंचायत समिती शाखा ८४ चे अध्यक्ष भरत जाधव यांच्या हस्ते झाले तर दीपप्रज्वलन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती चे अविनाश साळवी यांनी केले .बौद्धजन पंचायत समिती शाखा ८५ चे अध्यक्ष अशोक पाणे यांनी दर्शन पुष्पहार अर्पण केले तर वंचित बहुजन आघाडी वरळी चे महासचिव इलियास काझी यांनी धूप पूजन केले .बौद्धचार्य विजयकांत गायकवाड यांनी त्रिशरण पंचशील घेऊन त्रिवार वंदन केले .बहिष्कृत भारत डिजिटल मिडिया चे व्हिडीओ एडिटिंग हेड रवी गायकवाड यांनी चित्रण केले तर आकाश बोले यांनी तांत्रिक साहाय्य केले .
प्रस्तावना प्रकट करतांना बहिष्कृत भारत डिजिटल मिडिया चे संपादक आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन चे संस्थापक अध्यक्ष यांनी www.bahishkritbharat.in या न्यूज पोर्टल बद्दल माहिती देताना म्हटले की बाबासाहेबानी लिहलेल्या सर्व लिखानाचे तसेच संपादकीय लेखाचा समावेष करण्यात येईल. डॉ बाबासाहेबांना अपेक्षित चळवळीच्या लेखकांसाठी बहिष्कृत भारत हक्काचा प्लॅटफॉर्म असेल . त्याचबरोबर बाबासाहेबाना अपेक्षित पत्रकारिता , दर्जेदार आणि निष्पक्ष बातम्या सुद्धा वाचकांना एक क्लीकवर मिळतील.
त्याचबरोबर बहिष्कृत भारत युट्युब चॅनेल च्या माध्यमातून व्हिडीओ स्वरूपातील बातम्या आणि चळवळीचे कार्यक्रम बघायला मिळतील .
यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार प्रकट केले .बौद्धचार्य विजयकांत गायकवाड यांनी आपले विचार मांडताना म्हटले की खरोखरच जर आपण या पक्षीकातील अग्रलेख वाचले अन बातम्या वाचत राहिलं तर बाबासाहेबांचे विचार आणि चळवळ गतिमान करण्यासाठी फार उपयोगी पडेल.
वंचित बहुजन आघाडी चे वरळी तालुका महासचिव इलियास काझी म्हणाले की गोरगरीब पीडितांच्या दुःखाला कुणी वाचा फोडली असेल तर ती म्हणजे बाबासाहेबानी आणि बाबासाहेबांच्या पाक्षिक डिजिटल स्वरूपात आणून विचारांना जी वाचा दादाराव नांगरे यांनी फोडली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले .
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती चे अविनाश साळवी म्हणाले की हा उपक्रम अभिमानास्पद असून आम्हीही यापुढे बहिष्कृत भारत पक्षीकाचा वर्धापन दिन साजरा करू .
बौद्धजन पंचायत समितीचे अशोक पाणे म्हणाले की आपल्यानंतर च्या पिढीला बाबासाहेबांच्या ह्या क्षणाची व कार्याची जाण झाली पाहिजे .बाबासाहेबांची आठवण काढताना ते म्हणाले की लोकमान्य टिळक व बाबासाहेबांची शाब्दिक चकमक यातून बघायला मिळते .
बौद्धजन पंचायत समिती शाखा ८४ चे अध्यक्ष भरत जाधव यांनी बहिष्कृत भारत टीम चे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment