नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत किनवट मतदार संघातून दिनकर दहिफळे तर माहूर मधून प्रा. राजेंद्र नामदेवराव केशवे विजयी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 3 April 2021

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत किनवट मतदार संघातून दिनकर दहिफळे तर माहूर मधून प्रा. राजेंद्र नामदेवराव केशवे विजयी

 


किनवट, ता.४ : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत किनवट मतदार संघातून बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे हे विजयी झाले, तर माहूर मधून प्रा. राजेंद्र नामदेवराव केशवे हे विजयी झाले.

    नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची करून लढली गेली.यात भाजपाकडून प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार डी. बी. पाटील, आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक प्रतिष्ठेची केली, तर महाविकास आघाडीकडून आमदार प्रदीप नाईक व नामदेवराव केशवे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करून लढविली. यात महाविकास आघाडी ने मोठा विजय संपादन करत किनवट मधून बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहीफळे, तर माहूर मधून प्रा. राजेंद्र केशवे हे विजयी झाल्याने महाविकास आघाडीत चैतन्य निर्माण झाले आहे.

यामुळे महाविकास आघाडी च्या कार्यकर्त्यांना चांगलेच बळ प्राप्त झाले आहे. किनवट माहूर तालुक्यात भाजपाचे सत्ता असूनही त्यांना विजय संपादन करता आला नाही, हे विशेष.

No comments:

Post a Comment

Pages