जे एन यु विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात यावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 3 April 2021

जे एन यु विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात यावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

 मुंबई दि.3 - भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा दिल्लीतील जवाहरलाल नेहरू ( जे एन यु) विद्यापीठात  उभारण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे. त्याबाबत चे पत्र ना रामदास आठवले यांनी जे एन यु विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठविले आहे.

 

जे एन यु विद्यापीठात स्वामी विवेकानंद यांचा पुतळा आहे.त्या प्रमाणेच प्रज्ञासूर्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा  पुतळा जे एन यु विद्यापीठात  उभारावा अशी विद्यार्थ्यांची  मागणी आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थ्यांचे आदर्श प्रेरणास्थान ठरणारे प्रज्ञासूर्य आहेत. त्यांचा आदर्श घेत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची अधिक प्रेरणा मिळेल त्यामुळे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा बहुचर्चित जे एन यु विद्यापीठात उभारावा अशी सूचना करणारे पत्र ना रामदास आठवले यांनी जे एन यु विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठविले आहे.


            

No comments:

Post a Comment

Pages