डॉ.आंबेडकरांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा चे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 3 April 2021

डॉ.आंबेडकरांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा चे आयोजन

पुणे | :

मागील वर्षी म्हणजे एप्रिल 2020 रोजी आदर्श भीमयंती म्हणजेच 'भीमजयंती फ्रॉम होम' साजरी करण्यात आली होती.

कोरोना चा संसर्ग हा जास्तीत जास्त प्रमाणात होऊ नये , व आपल्यामुळे प्रशासनाला / जनतेला अथवा कोणाला त्रास होऊ नये हा एक त्यामागील उद्देश होता.

येत्या 2021 भीमयंतीच्या सुरुवातीलाच एक नवीन विषय खूप मोठ्या प्रमाणात पसरल्या जात आहे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा.


त्यासंदर्भात स्पर्धेचे विषय सध्य स्तिथीला उपयुक्त आणि फार गरजेचे असे निवडण्यात आले आहेत :-


१) नवीन उद्योजकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक प्रेरणास्थान.

[Tips: बौद्ध समाजात उद्योजक निर्माण झाले पाहिजेत, आर्थिक परिस्थिती सुधरल्यास जास्त समस्या निर्माण होणार नाहीत, ई बाबत लिहावे.!]


२) बुद्ध आणि त्यांचा धम्म - सर्व समस्यांचे निराकरण

[Tips: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेला 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा निर्माण होणाऱ्या सर्व वाद विवाद तसेच सर्व गोष्टींचे 'कोणतीही हिंसा न करता' निराकरण करू शकतो, ई बाबत लिहावे.!]


3)आपली ओळख बौद्ध की दलित

[Tips: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 नागपूर/चंद्रपूर ला तुम्हा आम्हाला बौद्ध धम्माची दिक्षा दिली आणि मुक्त केले सगळ्या सामाजिक बंधनातुन आणि वेगळी 'बौद्ध' नावाची ओळख दिली आहे.! म्हणूनच आपण ही दलित हा शब्द नामशेष करणे याबाबत लिहावे.!

 

विजेत्यांना बक्षिसे / पारितोषिक पुढीलप्रमाणे :


◆प्रथम क्रमांक - रोख रक्कम 10,000/-, सन्मानचिन्हे, प्रमाणपत्र, भारतीय संविधानाची प्रत व बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ.


◆द्वितीय क्रमांक - रोख रक्कम 7000/-, सन्मानचिन्हे, प्रमाणपत्र, भारतीय संविधानाची प्रत व बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ.


◆तृतीय क्रमांक - रोख रक्कम 4000/-, सन्मानचिन्हे, प्रमाणपत्र, भारतीय संविधानाची प्रत व बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ.


◆प्रथम दहा सहभाग घेणाऱ्या बंधू भगिनींना उत्तेजनार्थ मेडल्स व प्रमाणपत्रे देण्यात येतील.!


◆सर्व सहभाग घेणाऱ्यांना 'सहभाग प्रमाणपत्रं' देण्यात येईल.!



"या उपक्रमाला महाराष्ट्र भरातून खूप मोठा प्रतिसाद भेटतो  आहे, तसेच निबंधाचे विषय आणि पारितोषिक वितरणाचे खूपच कौतूक केले जात आहे असे आंबेडकरी युवा संघ चे अध्यक्ष सुनील धुतराज यांनी "मिडलपथ"शी बोलतांना सांगितले आहे.!

अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर वर कॉल करावा.!

संपर्क:- 8308177364/ 9561862358 / 9975304580/ 9623476655/9604870511

तसेच आणखी जास्तीत जास्त बौद्ध बांधवांनी या निबंध स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन देखील केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages