सरकारने पोलीस भरतीची जाहिरात तात्काळ काढावी - स्वप्निल इंगळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 3 April 2021

सरकारने पोलीस भरतीची जाहिरात तात्काळ काढावी - स्वप्निल इंगळे


नांदेड :  राज्य सरकारने 12500 पोलिस कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे जाहीर केले होते, परंतु आज पर्यंत शासनाला मुहूर्त सापडला नाही. त्यामुळे सरकारने पोलीस भरतीची जाहिरात तात्काळ काढावी या मार्गाचे निवेदन राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य इंजि.स्वप्नील इंगळे पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांना दिले आहे.

महाराष्ट्रात मागील 3 वर्षापासून पोलीस भरती झालेली नाही. राज्य सरकारने 12500 पोलिस कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे जाहीर केले. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात 8500 पोलिसांची भरती करू अशी घोषणा सरकारने केली. कोरोना साथीने सर्व जग ढवळून निघाले असून देशात सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. पुन्हा देशातील काही जिल्ह्यात अंश:त  टाळेबंदी चे निर्णय घेण्यात आले. कोरोनामुळे समाजातील बेरोजगारी वाढली असून खाजगी कंपन्या मनुष्यबळ कमी करण्यावर भर देत आहेत.आता बेरोजगार तरुणाईची दिसतो सरकारी नोकरीवर असून बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले तरुण-तरुणी सैन्यदलाला प्राधान्य देत आहेत. सरकारने पोलीस भरतीची जाहिरात तात्काळ काढावी, जाहिरात काढण्यात लागणाऱ्या विलंबामुळे युवावर्गात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरत आहे तसेच अनेक उमेदवाराचे वय संपत आहे. त्यामुळे सरकारने या विषयात गांभीर्याने लक्ष घालावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages