सुनील मगरे यांच्या मृत्यू प्रकरणात आंबेडकरी कार्यकर्त्यांचा अधिष्ठाता डॉ. कनन येळीकर यांना घेराव; मगरे कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 30 April 2021

सुनील मगरे यांच्या मृत्यू प्रकरणात आंबेडकरी कार्यकर्त्यांचा अधिष्ठाता डॉ. कनन येळीकर यांना घेराव; मगरे कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी

  


औरंगाबाद :  आंबेडकरी कार्यकर्ते सुनील मगरे यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या घाटी रुग्णालयाच्या दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ह्या साठी घेराव घालण्यात आला.

दि.२७ एप्रिल रोजी सुनील मगरे यांचा घाटी रुग्णालयात  रिकामे व गळके ऑक्सिजन सिलेंडर लावल्याने व डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे मृत्य झाला होता सदर प्रकार CCTV फुटेज मुळे समोर आल्याने आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत होता.

सदरचे प्रकरण मेडिकल बोर्डसमोर ठेवावे,मगरे यांच्या कुटुंबाला 50 लाख रु नुकसानभरपाई देण्यात यावी, पत्नीस शैक्षणिक पात्रतेनुसार रुग्णालयाच्या सेवेत सामावून घ्यावे,त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी शासनाने घ्यावी आदी मागण्या डॉ.येळीकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.


रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी जबाबदारी स्वीकारून या पुढे अश्या बाबतीत खबरदारी घ्यावी,रुग्णाची शिफ्टिंग करताना योग्य ती काळजी घ्यावी,भरलेल्या व रिकाम्या सिलेंडर चे वर्गीकरण वेळेत करण्यात यावे,स्ट्रेचर ची संख्या वाढवावी आदी सूचना करण्यात आल्या.

रुग्णालय प्रशासनाने नेमलेल्या समितीचा अहवालासोबतच मेडिकल बोर्डाला ह्या प्रकरणाची माहिती द्यावी ही विंनती करण्यात आली.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश हरबडे,डॉ.भारत सोनवणे,डॉ.मीनाक्षी भट्टाचार्य आदी उपस्थित होते.

तसेच नागराज गायकवाड,विजय वाहुळ,सचिन निकम,मनोज वाहुळ,गुणरत्न सोनवणे,मुकेश खोतकर,पवन पवार,पुंजाराम जाधव,नानासाहेब म्हस्के,राहुल जाधव,मेघानंद जाधव,रवी किर्तीशाही,सचिन भुईगळ,राजू बनकर,रमेश मगरे,सोनू नरवडे,कपिल बनकर,सचिन शिरसाठ,सागर साबळे,सोनू पाईकडे,राजेश भारसाखळे,नरेश वरठे,सोमु भटकर,प्रथम कांबळे,बंटी सदाशिवे,जयश्री शिरके, दिक्षा पवार,आनंद मगरे,विकास रोडे,ऍड.अतुल कांबळे,करण साकळे,पवन जाधव,पवन साबळे,लखन दांडगे,सुनील सदाशिवे आदींची उपस्थिती होती.



No comments:

Post a Comment

Pages