कोरोनामुळे वाढदिवस साजरा करू नये -सिद्धांत गंगाधर गाडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 29 April 2021

कोरोनामुळे वाढदिवस साजरा करू नये -सिद्धांत गंगाधर गाडे

औरंगाबाद :

पॅंथर नेते डॉ सिद्धांत गाडे यांचा 1 मे रोजी वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने व कामगार संघटनेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबवून वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो परंतु गेल्या वर्षभरापासून देशभरासह महाराष्ट्रात कोरोना महामारी ने थैमान घातले आहे या काळात अनेक जिवाभावाची माणसे या महामारी ने हिरावून घेतले आहे, कोरोना या महामारी ने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर, अनेक जण  रुग्णालयांमध्ये  मृत्यूशी झुंज देत आहे.  देशभरातील  ही भयाण परिस्थिती लक्षात घेऊन  यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय डॉ सिद्धांत गाडे यांनी  घेतला आहे. महाराष्ट्रासह औरंगाबाद शहरातही मृत्यूचे तांडव सुरू आहे हीच बाब लक्षात घेऊन सिद्धांत गाडे यांनी मागच्या वर्षीही आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसानिमित्त  लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या शहरातील अनेक भागातील गरजवंतांना किराणा किट चे वाटप त्यांच्या मार्फत करण्यात आले होते याबरोबरच मास्क वाटप सॅनिटायझर वाटप आदी कार्यक्रम राबविण्यात आले होते कोरोना महामारीचे संकट या वर्षीही कायम आहे रोज  अनेकजण मृत्युमुखी पडत आहे,  अशा अवस्थेत  वाढदिवस साजरा करणे  योग्य नाही त्यामुळे आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय डाॅ.सिद्धांत गाडे यांनी  घेतला आहे कार्यकर्त्यांनीही आपला वाढदिवस साजरा करू नये असे आवाहनही त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पथँर पावर कामगार युनियन च्या पदाधिकाऱ्यांना केले आहे.


No comments:

Post a Comment

Pages