सुनील मगरे यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा - आम्रपाली सुनील मगरे यांची बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 29 April 2021

सुनील मगरे यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा - आम्रपाली सुनील मगरे यांची बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार

 औरंगाबाद  :   दि.२७ एप्रिल रोजी स्मृ. सुनील रमेश मगरे (वय-३८) ह्यांना प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने अ‍ॅप्पल हॉस्पिटल (बायजीपुरा, औरंगाबाद) येथून सायंकाळी ८ च्या सुमारास अपघात विभागातील  कोविड कक्षात उपचारकामी दाखल केले सोबत अ‍ॅप्पल हॉस्पिटल चे डॉक्टर घाटीत येऊ पर्यंत सोबत होते पुढे ते निघून गेले

सायंकाळी सुमारे ८:००वाजेपासून ते ९:४० पर्यंत त्यांच्यावर अपघात विभागातील कोविड कक्षात उपचार करून त्यांना आता  सुपरस्पेशालिटी विभागात ऍडमिट करावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने त्यांना विभागातून हलवत असताना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता.

 सोबत असलेले स्मृ. सुनील मगरे यांचे भाऊ आनंद , गौतम हे व सोबतचे मित्र हे त्यांना कोविड विभागातून अवघ्या 10 फुटाच्या अंतरावर उभी असलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत स्ट्रेचरने घेऊन गेले सुनील यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने लावण्यात आलेलं ऑक्सिजन सिलेंडर हे संपलेले असल्याचे आढळून आले.

  तिथे असलेला एक आनंद नामक एक कंत्राटी कर्मचारी ह्याने धावत जाऊन दुसरे सिलेंडर घेऊन आला कर्मचाऱ्यांने आणलेला दुसरा सिलेंडरही  लिकेज असल्याचे लक्षात आले.

त्या दरम्यान  नातेवाईकांनी वारंवार रुग्णाला लावलेला सिलेंडर संपलेला असून रुग्णाला त्रास होत असल्याचे डॉक्टरांना सांगितले व आपण बाहेर येऊन रुग्णाला तपासावे अशी विंनती केली परंतु त्यांच्या विंनतीकडे डॉक्टरांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

 कर्तव्यावरील एकही cmo डॉक्टर,ऑनड्युटी डॉक्टर,ब्रदर,सिस्टर यांनी  दाद दिली नाही, परिणामी तिसरा सिलेंडर येऊ पर्यंत सुनील हे बेशुद्ध झाले होते ते कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद देत नसल्याने सोबत असलेल्या एका महिला नातेवाईक व एक मुस्लिम मित्र ह्यांनी त्यांना रुग्णवाहिकेत पम्पिंग करण्याचा प्रयत्न केला परंतु सुनील प्रतिसाद देत नसल्याने व डॉक्टरही येत नसल्याने हतबल होऊन नातेवाईकांनी त्यांना पुन्हा अपघात विभागात आणले तेव्हा डॉक्टरांनी पम्पिंग करण्याचा प्रयत्न केला व ते मयत झाल्याचे सांगितले.

       सुमारे 10 ते 12 मिनिटं ऑक्सिजन वाचून सुनील तडफडत होते नातेवाईक डॉक्टरांचा धावा करत परंतु 10 फुटावर असलेल्या विभागातून रुग्णवाहिकेपर्यंत उपचार करण्यास न आल्याने  आमच्या कुटुंबाचा आधार सुनील हे गतप्राण झाले ह्याला सर्वस्वी ड्युटीवरील डॉक्टर जबाबदार आहेत डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे आमच्या कुटुंबातील कर्ता पुरुष मृत झाल्याने आमचा आधार हिरावला गेला आहे.सदरील सर्व प्रकार हा तेथील CCTV कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे.

    त्यामुळे सुनील  मगरे यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या cmo डॉ.निलेश काथार, डॉ.महादेव घोरपडे, ऑनड्युटी डॉक्टर डॉ.पंकज खोब्रागडे, डॉ.शुभांगी कदम, ब्रदर आकाश दुशिंग,रवी रावत व सिस्टर प्रसन्ना राणी तलोरी यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आम्रपाली मगरे यांनी केली आहे .


No comments:

Post a Comment

Pages