पुणे रेल्वे स्टेशन येथे बॅग सॅनिटायजेशन च्या नावाखाली प्रवाशांची होत असलेली लुट थांबविणेकरीता वंचित बहुजन आघाडीने रेल्वे प्रशासनाला विचारला जाब.. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 29 April 2021

पुणे रेल्वे स्टेशन येथे बॅग सॅनिटायजेशन च्या नावाखाली प्रवाशांची होत असलेली लुट थांबविणेकरीता वंचित बहुजन आघाडीने रेल्वे प्रशासनाला विचारला जाब..

पुणे  : रेल्वे स्टेशनच्या गेटवर प्रवाशांकरिता अल्ट्रा वायलेट सॅनिटायजेशन मशीन बसवून प्रत्येक बॅगे करिता बळजबरीने दहा रुपये प्रमाणे पैसे घेण्यात येत आहेत.वास्तविक पाहता बॅगांचे सॅनिटायजेशन हे रेल्वे करून कंपल्सरी केलेले नसून ते आपल्या स्वच्छेने करून घेता येते. परंतु येथे कार्यरत असलेले कामगार मात्र प्रत्येक प्रवाशाला आपल्या सर्व बॅगा या मशीन मार्फत टाकण्यासाठी कंपल्शन करतात व बॅगा बाहेर आल्यानंतर प्रत्येक बॅगेला दहा रुपये प्रमाणे पैसे वसुली करतात. बॅगा सनिटेशन करून पुढे निघाल्यावर लगेचच काही लोक हातात सॅनिटायझर ची बाटली घेऊन उभे असतात ते प्रवाशांना ती बाटली, हॅन्ड ग्लोज देतात व त्याचा वापर केल्यावर लगेच शंभर रुपयाची मागणी करतात.सदर दिलेले टेंडर हे सत्ताधारी भाजपा पक्षाच्या वाहतुक अध्यक्षाचे आहे. आणि त्यामुळेच या दोन्हीही सुविधा या कंपल्सरी नसतानादेखील प्रवाशांना त्या मोफत असल्याचे भासवून हे लोक प्रवाशांची फसवणूक व आर्थिक पिळवणूक करीत आहेत.

 ही बाब वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांना लक्षात येताच वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते संतोष संखद, युवा आघाडीचे प्रदेश सदस्य ऋषिकेश नांगरेपाटील,  महासचिव जितेंद्र जाधव, सहसंघटक मनोज क्षिरसागर, स्वप्निल वाघमारे, रितेश गायकवाड, युवा आघाडीचे अतुल नाडे, ओंकार कांबळे, पितांबर धिवार, फरहान शेख,रोहन गायकवाड, सचिन कांबळे, गौतम कांबळे आदी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पुणे रेल्वे स्टेशनचे रेल्वे पोलीस निरीक्षक गौड साहेब, रेल्वे डी.आर. एम.यांना याबाबत निवेदन देऊन सदरची होत असलेली लूट ही ताबडतोब थांबवण्यात यावी बॅग सनिटायजेशन हे प्रवाशांकरिता मोफत करण्यात यावे अन्यथा वंचित आघाडी करून सदरच्या मशीन या तोडण्यात येतील असा इशारा देण्यात आला.

No comments:

Post a Comment

Pages