रस्ते रुंद करताना फक्त एका बाजूने करून एका बाजूची वृक्षतोड थांबवावी डॉक्टर अशोक बेलखोडे यांची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 30 April 2021

रस्ते रुंद करताना फक्त एका बाजूने करून एका बाजूची वृक्षतोड थांबवावी डॉक्टर अशोक बेलखोडे यांची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

 


किनवट, दि.३० : रस्ते रुंद करतांना फक्त एका बाजुने करुन एका बाजूची वृक्ष तोड  थांबवावी, अशी मागणी एका पत्राद्वारे सानेगुरुजी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अशोक बेलखोडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नुकतीच केली आहे.

   पत्रात नमूद केले आहे की,करोना महामारीच्या निमीत्ताने पर्यावरण रक्षणाचे व संवर्धनाचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. ऑक्सीजनसाठी होत असलेली मारामार व ऑक्सीजनच्या अभावामुळे होत असलेले मृत्यु आपल्या विकासाची दिशा पुन्हा एकदा तपासून पहायला भाग पाडत आहे. पल्स ऑक्सी, व्हेंटीलेटर, ऑक्सीजन काँन्सनट्रेटर सारख्या उपकरणांचे महत्व पुढे आले आहे. (या उपकरणांची कंपन्यांनी वाढविलेली किंमत व कृत्रीम टंचाई ही नैतीक अधोगती बाजूला ठेवून) ऑक्सीजन काँन्सट्रेटर हे यंत्र वातावरणातील ऑक्सीजन खेचून घेतो व त्याचा उपयोग कमी सिरीयस असलेल्या रूग्णाला होतो. पण आता हा प्रश्न येतो आहे, वातावरणात ऑक्सीजन तरी आहे कुठे?

   गडकरी  (रोड करी) साहेब आपण देशभर रस्ते मोठे करीत आहात, तयार झालेल्या रस्त्यांवर भरधाव गाडी चालवायला बरे वाटतही असेल पण हे सर्व रस्ते मात्र उजाड व भकास झालेले आहेत. गाडी थांबवायला सावली उरलेली नाही, पायी जाणाऱ्यांना व जनावरांची तर होत असलेली फजीती  ध्यानी मनी आली नसावी. शंभर – शंभर, दीड – दीडशे वयाची झाडे आपण निर्विकारपणे कापूण टाकली. नियमाप्रमाणे त्याची किंमत काढून ठेकेदाराने शासनाकडे जमा केली किंवा नाही याचा हिशोबही नाही पण इतके वर्ष ऑक्सीजन देणाऱ्या झाडाची मुळासकट गच्छंती करून, खांडोळी करून ठेकेदाराने पैसे कमावले व ऑक्सीजन संपविला.


आपल्याला एक करता आले नसते का? एकाच बाजुला रस्ता मोठा करून दुसऱ्या बाजुची पुर्ण झाडे वाचविता आली असती. वाढीव बाजूला नवीन झाडे लावून पुन्हा नव निर्माण करता आले असते. तशी तुम्ही ऑर्डर दिली म्हणा की, झाड लावल्या शिवाय ठेकेदाराचे पैसे देऊ नका पण मग तेही ३३ कोटी झाडांसारखे व्हायचे. एका बाजुची मोठी व जुनी झाडी संरक्षीत करून मागच्या पिढीने लावलेली एका बाजूला व तुमची पिढी आता लावणार असलेली त्याच्या बरोबरीने दुसऱ्या बाजूला हे जुन्या नव्याचे एकत्रित दर्शन विलोभनिय वाटले असते व आपण वातावरणातील ऑक्सीजन काही प्रमाणात वाचवू शकलो असतो.


एका बाजूचेच झाडे तोडावीत ही मागणी मी मागील पत्रात केली होती, अजूनही वेळ गेली नाही या पुढील रस्ते या पध्दतीने करावे, अशी सूचना व विनंती आहे. यातच खरे शहाणपण आहे असे वाटते, असे पत्रात शेवटी डॉक्टर अशोक बेलखोडे यांनी नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages