प्रशासनाने घालुन दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुनच भिमजयंती साजरी करा - फुले-शाहु-आंबेडकर युवा मंच - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 12 April 2021

प्रशासनाने घालुन दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुनच भिमजयंती साजरी करा - फुले-शाहु-आंबेडकर युवा मंच

नांदेड:भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ,महामानव ,बोधीसत्व प.पु. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशात मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी करण्यात येते;परंतु मागील वर्षापासुन संपुर्ण जगात कोरोना विषाणुने थैमान घातलेल आहे.दिवसें-दिवस रुग्णसंख्या वाढत चाललेली  आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने लाॅकडाऊन नियमन जाहीर केले आहे. त्यामुळे यावर्षीची जयंत ही कुटुंबासोबतच साध्या पद्धतीने साजरी करावी असे आवाहन फुले शाहू आंबेडकर युवमंचच्या वतीने करण्यात येत आहे.

मागील अनेक वर्षापासुन फुले-शाहु-आंबेडकर युवा मंचच्या वतीने दरवर्षी समाजहिताय कार्यक्रम(रक्तदान शिबीर, भव्य देखावा,मिरवणूक,सांस्कृतिक कार्यक्रम) घेतले जातात. संपूर्ण जगासह देश ,राज्य आणि जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे.याबाबीचा विचार केला असता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा एक अनोखा इतिहास नेहमीच पहावयास मिळतो. पण यावर्षी ही जयंती रस्त्यावर न उतरत लाखोंच्या संख्येने अभिवादन रॅली,या बाबी टाळून त्याऐवजी  साजरी होणाऱ्या भिमजयंती साजरी करायची आहे.डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी असल्यामुळे आपन मोठ्या प्रमाणात भीम  कोव्हिड -१९ व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करूनच आपल्या कुटंबासोबत घरी राहूनच साधी,डिजिटल पद्धतीने वैचारिक वारसा जोपासणारी भीमजयंती तमाम जनतेनी साजरी करावी. जयंतीचा उत्सव साजरा करत असतांना कुठल्याही नियमांचे भंग न होऊ देता.जिल्ह्यातील रुग्ण, आरोग्यसेवा, प्रशासन यांना सहकार्य करत जयंतीचा हा सोहळा पार पाडवा.  दरवर्षी फुले शाहू आंबेडकर युवा मंच आयोजित विविध उपक्रमांना चालना देऊन जयंती साजरी करण्याचाही एक इतिहास राहिलेला आहे.यावर्षी हे कोणतेही उपक्रम राबवले जाणार नसून  वर्षीपासून जगात covid 19 या रोगाचे थैमान चालू आहे  याचा  प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. ते रोखण्याचा एक भाग म्हणून त्या अनुषंगाने सामुदायिक एकत्रित न जमता घरीच बाबासाहेबांना अभिवादन करावे. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.बाबासाहेबांच्या अनुयायांना कोणत्याही प्रकारचे गालबोट लागनार नाही याची जबाबदारी आपण घेऊन शासनाने घालुन दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन महामानव बोधीसत्व प.पु.डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करावी.असे आवाहन फुले-शाहु-आंबेडकर युवा मंच चे जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे कंधारकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.






      

No comments:

Post a Comment

Pages