चैत्यभूमी समोरचे अनधिकृत बांधकाम अखेर तोडले ... आद.भिमराव आंबेडकर यांच्या प्रयत्नांना यश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 12 April 2021

चैत्यभूमी समोरचे अनधिकृत बांधकाम अखेर तोडले ... आद.भिमराव आंबेडकर यांच्या प्रयत्नांना यश

 

मुंबई :

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी झाकन्यासाठी लगतच्या  धर्मशाळेच्या दुरुस्ती करण्याच्या नावाखाली बृहन्मुंबई  महानगरपालिकेची  व सरकारची, CRZ ची परवानगी न घेता एक मजला कोरोनाच्या  महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असताना मागील एक वर्षापूर्वी मार्च 2020 मध्ये अनधिकृत बांधण्याचे कारस्थान झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे  चैत्यभूमी चे ट्रस्टी ,भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद.भिमराव य. आंबेडकर यांनी दि. 15जून 2020 रोजी व त्यानंतर पुन्हा दि. 30 जून 2020 रोजी महापालिका आयुक्त, सहाय्यक आयुक्त, (जी नॉर्थ विभाग ) यांच्याकडे ईमेल द्वारे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त श्री. दीघावकर यांनी स्वतः भेटून आद.भिमराव आंबेडकर यांना कार्यवाही करण्याबाबत आश्वासन दिले होते.

दि. 18/1/2021रोजी  जिल्हाधिकारी, मुंबई शहर, महापालिका , पोलिस विभाग यांना पुन्हा निवेदन दिले होते. सहाय्यक आयुक्त श्री. दीघावकर यांनी दि. 10/3/2021 रोजीच्या पत्राने सदरचे काम  आमदार श्री.सदा सरवणकर यांच्या आमदार फंडातुन म्हाडाने बांधले असल्याने त्याबाबत कळवून  त्याची प्रत आद.भिमराव आंबेडकर यांना पाठविली होती. या दुरुस्तीच्या कामी आमदार सदा सरवणकर यांचा फंड कमी पडला म्हणुन केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी फंड देऊन बांधकामासाठी सहकार्य केले आहे व या बाबत वरिष्ठ स्तरावर झालेल्या बैठकीत ना. रामदास आठवले व आमदार सदा सरवणकर हे उपस्थित होते. म्हाडाने दुरुस्ती केली परंतु  अनधिकृत एक मजला वाढविला नाही , नियोजन प्राधिकरण मुंबई महापालिका असल्याने ते तोडण्याची कारवाई  महापालिकेने करावी असे सदर बैठकीत सांगितले असल्याचे   म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

महापालिकेने अद्याप का कारवाई केली नाही , त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे ? चैत्यभूमीचे कोणतेही राजकारण न करताना ताबडतोब बांधकाम तोडावे यासाठी आद.भीमराव आंबेडकर सातत्याने पाठपुरावा करीत होते.दि. 9/4/2021 रोजी अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरू केले परंतु पुन्हा आमदार महोदयांनी ते थांबविले होते.त्यामुळे  समाजामध्ये नाराजी निर्माण होऊन त्यांचेवर  गुन्हा दाखल करावा  अशा तीव्र भावना सोशल मेडियावर उमटल्या होत्या. पोलीस , महापालिका प्रशासन यांची  बैठक होऊन दि 10 व 11 एप्रिल 2021रोजी  सदर बांधकाम  अखेर तोडण्यात आले आहे. मात्र ना. आठवले यांच्या पक्षाचे कार्यकर्ते यांनी स्वतः क्रेडिट घेणे, महापालिकेला  जाब विचारण्याच्या ऐवजी त्यांचा पक्षाच्या अध्यक्षाना का विचारात नाहीत असा प्रश्न आद.भिमराव य आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे व त्यांनी अखेर अनधिकृत बांधकाम तोडल्याबद्दल महापालिका , पोलिस प्रशासन यांचे हार्दिक आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment

Pages