शनिवारी होणारी राष्ट्रीय लोक अदालत पुढे ढकलण्यात आली - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 6 April 2021

शनिवारी होणारी राष्ट्रीय लोक अदालत पुढे ढकलण्यात आली

किनवट , दि.६ : येत्या शनिवारी (दि.१०) किनवट न्यायालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेली राष्ट्रीय लोक अदालत पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती जहांगीर पठाण यांनी दिली.

  येत्या शनिवारी किनवट न्यायालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेली लोक अदालत पुढील आदेश येईपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. या संदर्भाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे पत्र व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड चे  सचिव आर. एस. रोटे यांचे पत्र नुकतेच प्राप्त झालेले आहे.

राष्ट्रीय लोक अदालत पुढे ढकलण्यात आल्याची  सर्व पक्षकारांनी व वकिलांनी नोंद घ्यावी,असेही न्यायमूर्ती जहांगीर पठाण यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Pages