किनवट : सध्या सर्वीकडेच कोरोना या रोगाने थैमान घातले असुन किनवट मध्ये ही दररोज कोरोनाग्रस्त पेंशटच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. सध्या किनवट येथे दोन कोवीड सेंटर आहेत पण पेशंट ची संख्या पाहता आता आणखी एक कोवीड सेंटर करण्याची तयारी चालू आहे. अशा परिस्थितीत देखील किनवट येथील कोवीड सेंटर मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना भरपुर समस्यांना सामारे जावे लागत आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णांनी इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब कडे कोवीड सेंटर मधील समस्या सांगितल्या, त्यांनी सांगितले की, कोवीड सेंटर मध्ये डाॅक्टरांची संख्या कमी आहे तर काही डाॅक्टर २४ तास उपलब्ध राहत नाही तर काही ठिकाणी रात्री डाॅक्टर उपलब्ध राहत नाहीत व उपलब्ध असेल तरी रुग्णांकडे फेरी मारत नाहीत आणि मग रूग्ण जेव्हा सीरीयस होतो तेव्हा त्या रुग्णांना रेफर करतात, तसेच कोवीड सेंटर मध्ये स्वच्छतेचा ही अभाव आहे. या सर्व तक्रारी मिळताच इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब किनवट चे कार्यध्यक्ष आशिष शेळके व त्यांची सर्व टिम मिळुन कोवीड सेंटर किनवट येथे भेट देण्यासाठी साठी गेलेत. तर तीथे गेल्यावर तेथील डाॅक्टर व नर्स नी सांगितले की स्टाफ मधील दोन डाॅक्टरांना कोराना झाला आहे म्हणुन डाॅक्टरांची संख्या कमी आहे. तसेच त्यांनी सांगितले की, रुग्ण आमचे ऐकत नाही तर काही रुग्ण पळुन जायचा प्रयत्न करतात तर येथे सुरक्षा रक्षक ही नाही.
तेंव्हा इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब किनवट चे कार्याध्यक्ष आशिष शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, प्रशासनाला विनंती आहे की, किनवट कोवीड सेंटर येथे डाॅक्टरांची संख्या वाढवावी व सुरक्षा रक्षक उपलब्ध करून द्यावेत. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांना ही विनंती केली की डाॅक्टरांना सहकार्य करा. आणि किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांनी या सर्व तक्रारीकडे लक्ष देऊन यांची लवकर दखल घेऊन कोरोणाग्रस्त रुग्णांच्या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी विनंती केली.
No comments:
Post a Comment