लाॅकडाऊनच्या जाचक अटी रद्द करा अन्यथा ११ एप्रिल रोजी वंचितच्या वतिने मोर्चा काढण्यात येईल - फारुक अहमद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 6 April 2021

लाॅकडाऊनच्या जाचक अटी रद्द करा अन्यथा ११ एप्रिल रोजी वंचितच्या वतिने मोर्चा काढण्यात येईल - फारुक अहमद

नांदेड: एप्रिल महिना हा भीम जयंती, रमजान मास प्रारंभ व पाडवा या तिन मोठ्या सण-उत्सवांचा महिना असून या तीन सण उत्सवाच्या काळामध्ये रस्त्याच्या कडेला नाडा विकणाऱ्या फेरीवाल्या  पासून ते ट्रक व ट्रॅक्टर विकणाऱ्या मोठ्या व्यापा-यांसाठी वर्षातील सर्वात मोठी व्यापाराची संधी असते व राज्य सरकारच्या ब्रेक द चैनच्या नावाखाली लावलेल्या लॉकडाऊन  मुळे छोट्या व्यापा-यापासून मोठे उद्योगपती पर्यंत सर्वांवर अन्याय कारक ठरणार आहे त्यामुळे या जाचक अटी रद्द करून बाजारपेठ पुर्ववत चालू ठेवावी अन्यथा आम्ही वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्याच्या वतीने ११ एप्रिल रोजी नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्व छोटे मोठे व्यावसायिक व समविचारी संघटनांना सोबत घेऊन महामोर्चा काढण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुक अहमद यांनी आज जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात पुढील मागण्या मांडल्या आहेत. क्र. १ नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांना सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपापले दुकाने व प्रतिष्ठाने उघडी ठेवण्याची मुभा देण्यात यावी.क्र. 2 नांदेड शहर व जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव गल्ली स्तरापर्यंत वाढलेला असून प्रत्येक दोन ते तीन घरांच्या मागे एक रुग्ण आढळून येत आहे त्या तुलनेने शासन आणि प्रशासनाच्या वतीने आरोग्य सुविधा देण्यामध्ये शासन अपयशी पडत आहे त्यामुळे नांदेड येथे स्टेडियम अथवा आय टी एम कॉलेज किंवा इतर कोणतेही महाविद्यालय व मोठ्या इमारती ताब्यात घेऊन तात्काळ एक हजार रुग्णाचे 2 जम्बो हॉस्पिटल नांदेड येथे सुरू करण्यात यावे व तेथे किमान दोनशे ते तीनशे आयसीयू बेड आणि किमान दोनशे ते तीनशे ऑक्सिजनचे पेड या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

क्र. ३ नांदेड जिल्ह्यातील सर्व खाजगी हॉस्पिटल मधल्या आयसीयू मधील 50% बेड हे सर्वसामान्य लोकांसाठी आरक्षित करून महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार देण्याची व्यवस्था करण्यात यावी खाजगी हॉस्पिटल व खाजगी जनरल प्रॅक्टिशनर यांना कोरोनाचे रुग्ण तपासण्याची व रेमडिसीव्हीर इंजेक्शन स्तराच्या ट्रीटमेंट करण्याची मुभा देण्यात यावी व नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्व मेडिकल स्टोअर्स ला रेमडिसीव्हीर चे इंजेक्शन उपलब्ध करून विकण्याची परवानगी देण्यात यावी जेणेकरून या इंजेक्शनची काळाबाजारी होणार नाही व सर्वत्र हा इंजेक्शन उपलब्ध होईल 

क्र. ४ उपरोक्त विषयी आम्ही अशी मागणी करतो की येत्या दहा तारखेपर्यंत मोठ्याप्रमाणावर व्हॅक्सिनेशन

No comments:

Post a Comment

Pages