नांदेड :
१६७ वर्षा पूर्वी, दिनांक १६ एप्रिल १८५३ ला भारतात पहिल्यांदाच बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे दरम्यान रेल्वे धावली होती. त्या क्षणाच्या स्मरणात भारतीय रेल्वे दर वर्षी दिनांक १० ते १६ एप्रिल दरम्यान रेल्वे सप्ताह साजरा करत असते. यात रेल्वे सेवेत वर्षभर उत्कृष्ठ कार्य करण्याऱ्या रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांना पुरस्कार देवून गौरवण्यात येते. कोविड-१९ च्या प्रभावामुळे या वर्षीचा रेल्वे साप्ताह चा विडीयो कॉन्फेरेन्सिंग द्वारे साजरा करण्यात आला.
दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्रीय कार्यालयात ६६ वा रेल्वे साप्ताह पुरस्कार सोहळा (जी.एम. अवार्ड) आज दिनांक १६ एप्रिल, २०२१ रोजी साजरा करण्यात आला. कोविड-१९ च्या प्रभावामुळे या वर्षी विडीयो कॉन्फेरेन्सिंग द्वारे पुरस्कार वितरण करण्यात आले. यात मुख्य कार्यक्रम सिकंदराबाद येथे साजरा झाला, हैदराबाद, सिकंदराबाद, गुंटकळ, विजयवाडा, गुंटूर सह नांदेड रेल्वे विभागातील रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या हस्ते महाव्यवस्थापक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नांदेड रेल्वे विभागात श्री नागभूषण राव, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड विभाग यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नांदेड विभागात १२ व्यक्तिगत तर ०३ सांघिक पुरस्कार पुरस्कार देवून कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. नांदेड विभागाने दक्षिण मध्य रेल्वे मध्ये क्षेत्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य केले आहे. या वर्षी नांदेड रेल्वे विभागाला ०२ शिल्ड (ढाल) मिळाल्या आहेत. ज्यात उत्कृष्ठ मेडिकल रिलीफ व्हेन (एम.आर.व्ही.) आणि राजभाषा या दोन शिल्ड शामिल आहेत. या प्रसंगी श्री नागभूषण राव, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांच्यासह इतर विभागीय रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री गजानन माल्या, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांनी आपल्या उद्घाटन पूर्ण भाषणात वर्ष २०२०-२१ दरम्यान कोविड महामारीच्या समयी सुधा दक्षिण मध्य रेल्वे ने केलेल्या उत्कृष्ठ कार्याची माहिती दिली आणि सर्व रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या. श्री माल्या यांनी वर्षी क्षेत्रीय स्तरावर १७१ व्यक्तिगत, 9 सांघिक पुरस्कार घोषित केले तर ३५ ढाली (शिल्ड) ची घोषणा केली. श्री माल्या यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना आवाहन केले कि त्यांनी उपलब्ध साधनांचा आणि निधीचा योग्य आणि सुनियोजित वापर करावा तसेच उत्पन्न वाढीबरोबरच अनावश्यक खर्च कसा कमी करता येईल याचा विचार करावा.
या वर्षी दक्षिण मध्य रेल्वे ने ३०८ किलो मीटर नवीन रेल्वे पटरी जोडली आहे. ज्यात अकोला ते अकोट या ४४.४ किलोमीटर पटरी चा पण समावेश आहे. तसेच ७५० किलोमीटर रेल्वे लाईन चे विद्युतीकरण करण्यात आले आहे.
श्री माल्या म्हणाले कि सुरक्षा हि दक्षिण मध्य रेल्वे ची नेहेमीच प्राथमिकता राहिली आहे. या वर्षी ८१ रेल्वे फाटक बंद करण्यात आली, तर १३ रेल्वे फाटक इंटर लॉक करण्यात आली. तसेच ६४ रेल्वे पुलांचे अधुनीकरण करण्यात आले तर १४ ठिकाणी नवीन पादचारी पूल (एफ.ओ.बी.) बनविण्यात आले.
No comments:
Post a Comment