एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची गांधी फेलोशीपसाठी निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 22 April 2021

एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची गांधी फेलोशीपसाठी निवड

प्रतिनिधी | औरंगाबाद

एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयातील विद्यार्थी ऋषिकेश खंडाळे, भागवत जुंबाड आणि साकेत कुलकर्णी यांची गांधी फेलोशीपसाठी निवड झाली आहे. देशभरातील सुमारे १२ हजार ५०० विद्यार्थ्यांमधून २५० जणांची यात निवड झाली असून त्यात एमजीएमच्या तिघांचा समावेश आहे. हे तिनही विद्यार्थी आता विविध राज्यांमध्ये जाऊन गांधी फेलोशीपअंतर्गत ग्रामीण विकासविषयक विविध उपक्रमांमध्ये कार्य करतील. एमजीएमचे कुलपती अंकुशराव कदम, माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, कुलगुरू विलास सपकाळ एमजीएम वैद्यकीय रुग्णालयाचे उप अधिष्ठाता प्रवीण सूर्यवंशी, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, प्राचार्य डॉ. रेखा शेळके यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार करत अभिनंदन केले आहे.


पिरामल स्कूल ऑफ लिडरशीप यांच्या वतीने 2008 मध्ये गांधी फेलोशीप सुरू करण्यात आली. देशभरातील विविध राज्यांमध्ये ग्रामीण विकास, शिक्षणविषयक जनजागृती तसेच अन्य समाजप्रबोधनाच्या कामाप्रती विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ही दोनवर्षीय फेलोशीप प्रदान केली जाते. 2021-23 सत्रासाठी देशभरातून १२ हजार ५०० हजार अर्ज आले होते. त्यापैकी केवळ दोन टक्के विद्यार्थ्यांचीच अंतिम निवड झाली. ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतीच्या प्रक्रियेतून या विद्यार्थ्यांना जावे लागले. त्यामध्ये एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या बी.ए इंटरनॅशनल जर्नालिझमचा विद्यार्थी साकेत कुलकर्णी, बी.ए.एमसीजेचा विद्यार्थी भागवत जुंबड, एम.ए.एमसीजेचा विद्यार्थी ऋषिकेश खंडाळे यांची निवड झाली. आता त्यांना या फेलोशीपअंतर्गत देशातील कोणत्याही राज्यात जाऊन काम करावे लागेल. दरम्यान, बी.ए.एमसीजेचा विद्यार्थी अनिकेत जाधवची न्यूजलाँड्री या जगप्रसिद्ध न्यूजपोर्टलच्या आयडीपी डेटा जर्नालिझम फेलोशीपसाठी निवड झाली आहे. त्याचाही या वेळी सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Pages