देगलूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 16 April 2021

देगलूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

ददेगलूर :

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील साकेत बुद्ध विहाराच्या नियोजित ठिकाणी या ठिकाणी च्या नगरसेविका कमलबाई धोंडीबा जी वानखेडे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करूनभीम जयंती साजरा करण्यात आली यावेळी साकेत बुद्ध  विहाराच्या अध्यक्ष समीक्षा अशोक कांबळे,उपाध्यक्ष संगीताबाई नागोराव वानखेडे,सचिव आम्रपाली भिमराव भाटापूरकर, कोषाध्यक्ष जनाबाइ वनंजे, सावित्राबाई सोनकांबळे,शोभाबाई माकणीकर,तर यावेळी भीमराव यादवराव भुताळे यांनी पंचशील त्रिशरण ग्रहण केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.


     कोवीड-कोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षीची भीम जयंती सर्वांनी घरातच साजरा केली व नियोजित बुद्धविहाराचे ठिकाणी सर्व शासनाचे नियम पाळून भीम जयंती मोठ्या हर्षउल्हासात  साजरी करण्यात आली.

    येथील बुद्ध विहारा च्या ठिकाणी देगलूर तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार विनोदजी गुंडमवार व देगलूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान रावजी धबडगे यांनीदेखील भेट दिली.

No comments:

Post a Comment

Pages