मुंबई दि.14 - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील भारत; समतावादी भारत ; जातीमुक्त भारत साकार करण्याचा निर्धार करूया असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. आज सकाळी ना. आठवले यांच्या बांद्रा पूर्वेतील संविधान निवासस्थानी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ना.रामदास आठवले बोलत होते.यावेळ सौ. सीमाताई आठवले; कुमार जित आठवले यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर ;मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; सिद्धार्थ कासारे;दयाळ बहादूरे; ऍड. अभया सोनवणे; उषा रामळू आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे भाग्यविधाते ठरले आहेत. त्यांनी सर्व समाज घटकांचा विचार करून सर्वांच्या कल्याणसाठी समता बंधुता न्याय आणि एकतेचा संदेश दिला आहे.जगतातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थविषयक विचार भारताच्या प्रगती साठी उपयुक्त आहेत.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार भारत जगात महासत्ता होऊ शकतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचा वारसा आम्ही चालवीत असल्याचा आम्हाला गर्व असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले.
No comments:
Post a Comment