रुग्णांना जीवदान देणारी रुग्णालये निष्कळजीपणामुळे मृत्यूचे सापळे ठरू नयेत - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 23 April 2021

रुग्णांना जीवदान देणारी रुग्णालये निष्कळजीपणामुळे मृत्यूचे सापळे ठरू नयेत - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. 23 - महाराष्ट्रात रुग्णालयात  निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडण्याचे प्रकार वाढले आहेत.भंडारा येथे रुग्णालयाला आग लागून अनेक नवजात बालके दगावली; भांडुप येथे कोविड रुग्णालयाला आग लागून अनेक रुग्ण मृत्यूमुखी पडले; काल नाशिक मध्ये ऑक्सिजन टॅंक गळतीमुळे 29 रुग्ण मृत्यू मुखी पडले तर आज विरार च्या विजय वल्लभ कोविड रुग्णालयाला आग लागून 13 जण मृत्यू पावले. या घटना पाहता महाराष्ट्रात रुग्णांना जीवदान देणारी रुग्णालये निष्कळजीपणामुळे मृत्यूचे सापळे ठरू लागले आहेत त्यामुळे राज्य सरकार ने केंद्र सरकार वर आरोपबाजी न करता राज्यातील रुग्णालयांकडे लक्ष देऊन रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले.आज ना रामदास आठवले यांनी नाशिक च्या डॉ झाकीर हुसेन रुग्णालयाला भेट देऊन ऑक्सिजन टॅंक गळती झाल्याच्या दुर्घटना स्थळाची आणि रुग्णालयाची पाहणी केली.या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. 


नाशिकच्या डॉ.झाकीर हुसैन  रुग्णालयात   ऑक्सिजन टॅंक गळतीमुळे 29 रुग्णांचे प्राण गेले. या दुर्घटनेमुळे कोविड युद्धात संपूर्ण राज्यात सावधानतेचा  इशारा गेला आहे. रात्यातील सर्व रुग्णालयात प्राणवायू साठवणूक टाक्यांची तपासणी नियमित करून खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करावे; ऑक्सिजन साठवणूक टाक्यांचेही नियमित तपासणी करावी रुग्णालय प्रशासनाने दक्ष राहावे अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली आहे.  यावेळी रिपाइं चे काकासाहेब खांबाळकर; प्रकाश लोंढे;चंद्रशेखर कांबळे आदी रिपाइं पदाधिकारी उपस्थित होते.


                

No comments:

Post a Comment

Pages