घाटीतील डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे आंबेडकरी कार्यकर्ते सुनील मगरे यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 27 April 2021

घाटीतील डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे आंबेडकरी कार्यकर्ते सुनील मगरे यांचे निधन

औरंगाबाद : दि.27 रोजी  सायंकाळी कोरोनाच्या उपचारकामी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल बापूनगर (गांधीनगर) येथील आंबेडकरी कार्यकर्ते सुनील रमेश मगरे यांचे आज रात्री १०:४८ वाजेच्या सुमारास  संपलेला व गळक्या सिलेंडर मुळे सुमारे 15  मिनिटे उपचारासाठी डॉक्टरांनी विलंब केल्याने निधन झाले ते 38 वर्षाचे होते.


मागील 2 दिवसांपासून अपोलो हॉस्पिटलमध्ये (बायजीपुरा) येथे त्यांच्यावर पोट दुखत असल्याने उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांना  निमोनिया चे निदान झाले. परंतु व्हॅटिलेटर उपलब्ध न झाल्याने त्यांना आज दि.२७ रोजी सायंकाळी ८ वाजता नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात अपघात विभागात दाखल केले तेथे त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने SSB युनिट ला पाठवण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला अपघात विभागातून रुग्णवाहिकेतून हलविण्यासाठी बाहेर आणण्यात आले परंतु त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना तातडीने ऑक्सिजन लावणे गरजेचे असल्याने कंत्राटी कामगार धावत सिलेंडर घेऊन आला परंतु तो सिलेंडर रिकामा असल्याने तो पुन्हा घाईघाईने दुसरा सिलेंडर घेऊन आला परंतु तो सिलेंडर ही गळका निघाल्याने नातेवाईक रुग्णाची गंभीर स्थिती पाहून हतबल पणे डॉक्टरांचा धावा करू लागले परंतु एकही जबाबदार डॉक्टर बाहेर आले नाहीत रुग्णाचे नातेवाईक व काही लोकांनी धावत जाऊन सिलेंडर उचलून आणले परंतु तोवर रुग्णाची स्थिती हाताबाहेर गेली होती हे पाहून आजूबाजूचे लोक व रुग्णाचे नातेवाईक यांनी रुग्णवाहिकेत जाऊन रुग्णाला पंपिंग केली त्यावेळी धावत एक दैनिक वेतनावरील महिला कर्मचारी रुग्णाला वाचविण्याचा प्रयत्न करू लागली परंतु बाहेर नातेवाईकाची धावपळ असतांना देखील काही फुटावर असलेल्या मगरे ह्यांचा कडे 15 मिनिटात एकही डॉक्टरांनी  प्रकृतीकडे लक्ष न दिल्याने धावतच नातेवाईकांनी अखेर सुनील मगरे यांना अपघात विभागात दाखल केले परंतु त्यांची प्राणज्योत मालवली असता नातेवाईकांनी आरडाओरडा केल्याने डॉक्टरांनी पेशन्ट ची पंपिंग करणे सुरू केले परंतु त्याचा काही फायदा झाला नाही.


आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते घाटीत दाखल झाल्यानंतर त्यांनी प्राप्त परिस्थिती ची माहिती घेत डॉक्टरांना धारेवर धरले असता सिलेंडर आणायला धावणारा दैनिक वेतनावरील कर्मचारी आनंद ह्याने सिलेंडर संपल्याचे कबुल केले कार्यकर्ते व नातेवाईक येत असल्याने रुग्णालय प्रशासनाने पोलीस व सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावून घेत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला परंतु जमाव आक्रमक होत असल्याने सहा. पोलीस निरीक्षक शेख व कर्मचारी यांनी मध्यस्थी केली असता तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली असता अधीक्षक डॉ.सुरेश हरबडे यांच्या कक्षात फुटेज तपासणी केली असता सदर प्रकार स्पष्ठ झाला असून तात्काळ संबंधितावर कडक कारवाई करावी तसेच त्यावेळी कर्तव्यावर असलेले cmo डॉ.निलेश काथार, डॉ.महादेव घोरपडे, ऑनड्युटी डॉक्टर डॉ.पंकज खोब्रागडे, डॉ.शुभांगी कदम ब्रदर आकाश दुशिंग,रवी रावत व सिस्टर प्रसन्ना राणी तलोरी यांच्या वर कारवाई करावी अशी मागणी केली आहे .

 

सुनील रमेश मगरे यांच्या पश्चात आई,दोन भाऊ,एक बहीण,पत्नी व दोन मुली असा मोठा परिवार आहे महाविद्यालयीन जीवनापासून आंबेडकरी चळवळीत ते सक्रिय होते मा.मंत्री गंगाधर गाडे यांच्या पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते होते त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने सगळीकडे हळहळ होत आहे.

No comments:

Post a Comment

Pages