45 वर्षांवरील लाभार्थ्यांसाठी कोविशिल्डचा दुसरा डोस ; नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर 100 डोसचा पुरवठा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 14 May 2021

45 वर्षांवरील लाभार्थ्यांसाठी कोविशिल्डचा दुसरा डोस ; नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर 100 डोसचा पुरवठा

नांदेड  दि. 14 :- जिल्ह्यातील 45 पेक्षा अधिक वय वर्षे असलेल्या ज्या नागरिकांचा दुसरा डोस बाकी आहे अशा नागरिकांना आज कोविशील्डचा दुसरा डोस उपलब्ध केला आहे. डोसच्या उपलब्धतेप्रमाणे जिल्ह्यातील 91 केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. 15 मे साठी प्रत्येक केंद्रनिहाय प्रत्येकी 100 डोस याप्रमाणे कोविशिल्ड मिळाले आहेत. ज्या नागरिकांनी पहिला कोविशिल्डचा डोस घेतला आहे त्यांनी लसीकरण केंद्रावर उपलब्धतेप्रमाणे लस घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे यांनी केले आहे. ज्या प्रमाणात जिल्ह्यातील केंद्रांसाठी लस उपलब्ध होत आहेत त्याप्रमाणात लसीकरणासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा कटिबद्ध असून टप्याटप्यात सर्वांना लसीकरण केले जाईल. नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करुन लसीकरणाबाबतची वस्तुस्थिती समजून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

 

जिल्ह्यातील ज्येष्ठ व्यक्तींना प्राधान्याने लसीकरण व्हावे याची खबरदारी कुटुंबातील सदस्यांनी घेऊन तसे नियोजन करणे उचित राहिल. लसीकरण केंद्रावर 18 ते 45 वयोगटातील युवक-नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन अनावश्यक गर्दी करु नये. नांदेड शहरात पुढीलप्रमाणे लसीकरण केंद्र आहेत. यात श्री गुरु गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा, सिडको असे एकूण 8 केंद्र आहेत. शहरी हद्दीत सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय असे एकूण 16 केंद्र आहेत. ग्रामीण हद्दीत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु असून एकूण 67 केंद्र आहेत. या प्रत्येक केंद्रावर आजच्यासाठी कोविशिल्ड या लसीचे 100 डोस उपलब्ध मिळाले आहेत. लसीकरणाच्या या मोहिमेत नागरिकांनी सहकार्य करावे. नांदेड जिल्ह्यात 14 मे पर्यंत कोविशिल्डचे 3 लाख 34 हजार 930, कोव्हॅक्सिनचे 96 हजार 440 डोस असे एकुण 4 लाख 31 हजार 370 डोस मिळाले आहेत. जिल्ह्यात 13 मे 2021 पर्यंत एकुण 3 लाख 91 हजार 721 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

 

कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 12 ते 16 आठवडे या कालावधीत म्हणजेच 84 दिवसानंतर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उपलब्ध असलेला कोविड-19 लसीचासाठा हा केवळ 45 वर्षावरील लाभार्थ्यांना प्राधान्याने दुसरा डोस देण्यासाठी व दुसरा डोसचे लाभार्थी नसल्यास प्रथम डोससाठी वापरण्यात येणार आहे. 18 ते 44 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण तात्पुरते थांबवण्यात आले आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जावून अनावश्यक गर्दी करु नये. तसेच कोविड-19 लसीकरण कार्यक्रमास सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत केले आहहे.


No comments:

Post a Comment

Pages