शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी 1 जूननंतर कापूस बियाणाची लागवड करावी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 14 May 2021

शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी 1 जूननंतर कापूस बियाणाची लागवड करावी

नांदेड  दि. 14 :-  शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खरीप हंगाम 2021 मध्ये बियाणे विक्रेत्यांनी 1 जून पूर्वी शेतकऱ्यांना कापुस बियाण्याची विक्री करु नये. तर शेतकऱ्यांनी पण 1 जुनच्या अगोदर कापुस बियाण्याची शेतात लागवड करु नये. हंगामपूर्व कापसाची लागवड केल्याने शेंदरी बोंडअळीचा पुर्न: उत्पतीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामूळे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना हंगामपुर्व बियाणे उपलब्ध करुन न दिल्यास व शेतकऱ्यांनी हंगामपूर्व लागवड न केल्यास शेंदरी बोंडअळीचा होणारा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. त्यामूळे शेतकऱ्यांनी हंगामपूर्व कापूस बियाण्याची लागवड करु नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Pages