मुक्ती कोण पथे.? ची 85 वर्षे.!- शिल्पकार नरवाडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 30 May 2021

मुक्ती कोण पथे.? ची 85 वर्षे.!- शिल्पकार नरवाडे

मुंबई ईलाखा महार परिषद ही ऐतिहासिक परिषद मुंबई येथे 30,31 मे आणि 1,2 जून 1936 अशी एकूण चार दिवस पार पडली.!

कोणत्याही गोष्टीचे मूळ शोधणे ही काही साधी गोष्ट नव्हती, म्हणून केवळ जनतेच्या हितासाठी चार दिवस सलग परिषद घेणे ही काही साधी बाब नव्हती, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रति असलेला विश्वास यामुळेच हे शक्य झाले.!

व्यासपीठावर पाचशे च्या वर मंडळी बसू शकत होती इतके ते विस्तृत व्यसपीठ होते.!

परिषदेची उत्सुकता शिगेला पोचली होती , कार्यक्रम सुरू होण्याची वेळ ही 7 वाजता ची असली यरी देखील 4 वाजतपासून सर्व कार्यकर्ते तसेच प्रतिनिधी आणि 30,000 ते 35,000 लोकांच्या समूहाने मंडप गच्च भरून गेला होता,

परिषदेमध्ये खालील ठराव प्राप्त झाले :

1) मुंबई इलाख्यातील महार जातीची ही परिषद पूर्ण विचारांती असे जाहीर करते की महार जातीला समाजात समता, स्वतंत्र मिळण्यासाठी 'धर्मांतर' करणे हाच एक न्याय आहे.

ही परिषद आमचे एकमेव परमपूज्य पुढारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना निश्यपूर्वक जाहीर अश्वासहन देते की महार समाज सामुदायिक रित्या धर्मातर करणार आहे.

3) पूर्वतयारी म्हणून महार जातीने इथून पुढे हिंदू देवतांची पूजा अर्चा करू नये, हिंदूंचे सण, वृत्त , वैकल्य , उपाषने वगैरे पाळू नयेत, हिंदूंच्या कोणत्याही उत्सवात भाग घेऊ नयेत.


हा ठराव नाशिकचे सुप्रसिद्ध पुढारी श्री भाऊराव कृष्णराव गायकवाड यांनी मांडला असून सर्वांनी त्यास अनुमोदन दिले.!

 

हे भाषण बौद्ध तरुणांनी वाचलेच पाहिजे, 1935 ला येवले येथे धर्मांतराची घोषणा झाल्यानंतर 1936 ला धर्मातर करण्याचें मुख्य कारण काय आहेत हे जवळपास एकाच वर्षयांनतर सर्व जनतेसमोर 'Root Cause'  सादर केले आणि मुक्ती कोण पथे या भाषणाचा शेवट हा 'तथागत गौतम बुद्धांचा' मी सांगतो म्हणून नाही तर तुम्ही 'स्वयंप्रकाशित' व्हा.! यार्थीचा उपदेश देऊन केला.


यानंतर त्यांच्या जनता , प्रबुद्ध भारत या पक्षीकात/वृत्तपत्रात ते धर्मांतर करण्याचे महत्व काय ते पटवून देत गेले. आणि 1956 मध्ये नागपूर , चंद्रपूर , अकोला येथे कोणतेही आमिष न दाखवता जगातील सर्वात मोठे धर्मातर केले.!

तसेच या देशातील सर्व जनतेला, पूर्वाश्रमित महार आताच्या बौद्ध जनतेला "धर्मांतर" या बाबीसाठी मिशनरी होणायचा मंत्र दिला..!


म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 'धम्मचक्र' गतिमान करून ती जबाबदारी आता बौद्ध तरुण-तरुणींच्या खांद्यावर ठेवली आहे.!


बोधिसत्व, बौद्ध धर्माचे अंगिकर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम.!

तसेच बौद्ध बांधवांना 'मुक्ती कोण पथे' दिनाच्या सदिच्छा.!


- शिल्पकार नरवाडे

No comments:

Post a Comment

Pages